भरधाव ट्रकने तब्बल १२ गाईंना उडवले; काही काळ महामार्ग ठप्प

nashik mumbai highway
nashik mumbai highwayesakal
Updated on

इगतपुरी शहर (जि.नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील (mumbai-nashik highway) इगतपुरी येथील पिंप्री फाट्याजवळ सोमवारी (ता.१४) सायंकाळी भरधाव ट्रकने १२ गाईंना उडवले. (truck-accident-12-cows-dead-nashik-mumbai-highway-marathi-news)

मुंबई-नाशिक महामार्गावरील थरार

सोमवारी सायंकाळ नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक जात असताना पिंप्री फाट्याजवळील पार्वती पेट्रोल पंपासमोर (एमएच-१५- एफव्ही-५८५० (बलकर) च्या वाहन चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. यामुळे महामार्गाच्या कडेने जाणाऱ्या जनावरांच्या तांड्यावर ट्रक धडकल्याने १२ गाईंना उडवले. यात ९ गायींचा जागेवर मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाल्या. तीन गंभीर गाईवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. या अपघातामुळे काही काळ महामार्ग ठप्प झाला होता.

काही काळ महामार्ग ठप्प

अपघातामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर ठप्प झाली होती. या वेळी इगतपुरी पोलिस, स्थानिक नागरिक, टोल कर्मचारी, महामार्ग पोलिसांनी मदतकार्य करत जखमी गायींना प्राथमिक उपचारासाठी वाडीवऱ्हे येथील गोशाळेत दाखल केले. यानंतर इगतपुरी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात ठार झालेला सर्व गाई नगर जिल्ह्यातील अकोले येथील आहे. संबंधित शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी केली आहे. ट्रक चालकाला इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे.

nashik mumbai highway
माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

अपघाती घटनेत अनेक जनावरे दगावले जातात

पावसाळा सुरू होताच तालुक्यातील अनेक पाळीव गायी पांजरपोळ येथे रवाना केल्या जातात. शेतकरी या गायी पांजरपोळ येथून काही महिन्यांकरिता घेतात व पालनपोषण करून जनावरांची वाढ करतात. यावर काही शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अनेकदा अपघाती घटनेत अनेक जनावरे दगावले जातात. याबाबत शासनाने उपाययोजना करावी. - बाळासाहेब धुमाळ, शेतकरी नेते.

nashik mumbai highway
सुरगाण्यातून गुजरातमध्ये पोचविल्या जायच्या नकली नोटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.