Tribal Cultural Festival : आदिवासी महोत्सवात 29 लाखांची उलाढाल

Department of Tribal Development
Department of Tribal Developmentesakal
Updated on

नाशिक : आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात चार दिवसात २९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा, लघुपट महोत्सव आदीचे आयोजन करण्यात आले होते. (Turnover of 29 lakhs in state level Tribal Cultural Festival Nashik News)

महाराष्ट्रातील आदिवासी सांस्कृतिक मूल्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी पारंपारिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गोडी चित्रकला, गवताच्या वस्तु, बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातूकाम, मातीकाम, पारंपारिक वनौषधी, लाकडी व लगद्याचे मुखवटे आदींचे भव्य प्रदर्शन आणि खरेदी-विक्री झाली. महोत्सवात नाशिकररांसह राज्यभरातून आलेल्या बांधवांनी २८ लाख ७९ हजार ४३० रुपयांची खरेदी केली.

यात मंगळवारी (ता. १५) ४ लाख ६९ हजार २९४ रुपये, बुधवारी (ता. १६) ६ लाख ४१ हजार ७५७, गुरुवारी (ता. १७) १५ लाख १ हजार ७७९ रुपये तर, शुक्रवारी (ता. १८) २ लाख ६६ हजार ६०० रुपयांची विक्री झाली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Department of Tribal Development
SAKAL Exclusive : महागड्या चारचाकींवर चोरट्यांचा ‘डोळा’

दरम्यान महोत्सवाचे उद्‌घाटन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी महोत्सवात उभालेल्या स्टॅालला भेटी देत खरेदी केली.

लाकडापासून हस्तनिर्मित कलाकृतींची खरेदी केली. यात ४ कासव, १० हरिण मुंडी, १० मोर, १ म्युझिशियन सेट, ४ अलंक आर्ट, १ जामळी आर्ट, अशा ४० नगर खरेदी केले. यासाठी त्यांनी ३१ हजार ८०० रुपये मोजले. या सर्व वस्तू राजभवनात जाणार आहेत.

Department of Tribal Development
Nashik ZP : 50 कोटींच्या कामांची मान्यता धोक्यात; पंधरावा वित्त आयोगाचा निधी अजूनही नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.