गणेशोत्सवात कोटीची उलाढाल; 2 वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई

Sculpture artist
Sculpture artistesakal
Updated on

जुने नाशिक : यंदाचा गणेशोत्सवाचा उत्साह आणि वाढती महागाईमुळे गणेशोत्सवातील विविध प्रकारच्या तयारी तसेच खरेदीत मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. सर्वच प्रकारच्या गोष्टी ग्राह्य धरल्या तर सुमारे २० ते २५ कोटीपेक्षाही अधिक उलाढाल झाल्याची शक्यता व्यवसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Turnover of crores in Ganeshotsav Compensation for damages within 2 years Nashik Latest Marathi News)

कोरोना प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाला. मोठमोठ्या मंडळाकडून आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खर्चाची चिंता न करता सर्वांनी धुमधडाक्यात उत्सव साजरा केला. मंडळांची आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची या वेळी संख्या अधिक होती.

घरोघरी यंदा गणेशोत्सवाची धूम असल्याचे दिसून आले. गणेशमूर्तींच्या मागणीत चांगली वाढ झाली होती. शहरभरात अडीच लाखाहून अधिक गणेशमूर्तीची खरेदी विक्री झाली. मोठ्या मूर्ती तर आणखीनच वेगळ्या. सहा इंचापासून तर २५ फुटापर्यंत मूर्ती १०० रुपयांपासून ८ लाखापर्यंत मूर्तींची खरेदी विक्री झाली.

त्यातूनच सुमारे नऊ ते दहा कोटींची उलाढाल झाल्याचे मूर्ती विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय घरगुती आराससाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू, सिंहासन, मंदिर, आर्टिफिशिअल ज्वेलरी, आर्टिफिशिअल फुले पाने, गालिचे, प्लॅस्टिक वृक्षांच्या पानांनी सजलेल्या जाळ्या, चमकीचे कापड, फोम सीट, नैसर्गिक फूल, पाने, फुलांचे हार, तोरण अशा विविध वस्तूंच्या खरेदी विक्रीतूनही मोठी आर्थिक उलाढाल झाली.

Sculpture artist
Crime : गणेशवाडीतील मंडई होतेय आता चोरट्यांचे ‘लक्ष्य’

त्याचप्रमाणे यंदा मोठे मंडळे अधिक असल्याने या मंडळांकडून उभारण्यात आलेले देखाव्यातील उलाढाल, गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, ढोलपथकांचीदेखील उलाढाल कोटीच्या घरात झाली.

इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली उलाढाल दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करण्याची मिळालेल्या संधीमुळे होऊ शकली. याशिवाय देखावे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच घरगुती आरास उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली होती. त्या वाढलेल्या दरांनी उलाढालीचा आर्थिक स्रोत वाढला.

"यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. मूर्तीला चांगली मागणी होती. देखावे तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू यांचीही मागणी चांगली मागणी होती. यातून झालेली आर्थिक उलाढाल कोटींच्या घरात गेली आहे. दोन वर्षात झालेले नुकसान यामुळे बहुतांशी प्रमाणात भरून निघाले आहे." - संजय परदेशी, गणेशमूर्ती विक्रेता

Sculpture artist
Dhule : लम्पी आजारावर लसीची मात्रा; शेतकऱ्यांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.