Nashik News : चारा टंचाईमुळे जनावरे विक्रीस ग्राहकच मिळत नसल्याने उलाढालही मंदावली

Animals brought for sale in the market within the premises of the committee.
Animals brought for sale in the market within the premises of the committee.esakal
Updated on

Nashik News : कसमादे परिसरात गेल्या तीन महिन्यापासून पुरेसा पाऊस न झाल्याने या वर्षी जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी खरीप हंगामातील बाजरी व मक्याचा कडबा जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडतो.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पेरण्या वाया गेल्या. पाणी व चारा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाइलाजाने जनावरे बाजारात आणण्यास सुरवात केली आहे.

जनावरे विक्रीसाठी येत असले तरी त्यांना खरेदी करण्यासाठी ग्राहकच मिळत नसल्याचे चित्र येथील बाजार समिती आवारातील जनावरांच्या आठवडे बाजारात दिसत होते. (turnover slowed down as there were no customers for sale of animals nashik news)

जनावरांच्या बाजारात शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गायी, बैल, रेडा, म्हशी आदी जनावरे विक्रीसाठी येत आहेत. मात्र दुष्काळामुळे आणि जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने मोठ्या संख्येने जनावरे पशुपालक विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहे. मात्र या जनावरांना घेण्यासाठी ग्राहकच बाजारात नसल्याने परिणामी बाजारातील उलाढालही मंदावली आहे.

त्यामुळे जनावरांच्या बाजाराला दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. मंदीमुळे लाख रुपयाला मिळणारी बैलांची जोडी ५० ते ६० हजार रुपयांना विक्री होत आहे. शेतकऱ्यांकडे हिरवा चारा नाही. सुक्या चाऱ्यावर तीन महिने शेतकऱ्यांनी जनावरे जगविली. साधारणतः: मका व बाजरीचा कडबा जनावरांना दिवाळीपर्यंत पुरतो.

काही शेतकरी कडब्याच्या गरी रचून ठेवतात. चार-सहा महिने हा चारा सहज पुरतो. याशिवाय शेतमळे फुलल्याने शेत शिवारातील गवत जनावरांना मिळते. मात्र तीन महिने दमदार पाऊस नसल्याने शेतशिवार उजाड झाली आहेत. जनावरांसाठी हिरवा चारा मिळेनासा झाला आहे.

बाजारात हिरव्या चाऱ्याचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. चाऱ्याबरोबरच जनावरांचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तलाव, पाझर तलाव, विहिरी, शेततळे कोरडेठाक होत आहेत. चारा व पाण्याअभावी जनावरे विक्रीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Animals brought for sale in the market within the premises of the committee.
Nashik News : पर्यटकांनी साधली धबधब्यांची पर्वणी; इगतपुरीसह भंडारदऱ्यात पर्यटकांची झुंबड

मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काम नसल्याने जनावरे खरेदीकडे मोठ्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. पुरेसे ग्राहक नसल्याने जनावरांचे व्यापारीदेखील खरेदी-विक्रीचा व्यवहार बेतातच करीत आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या किमती ५० टक्क्यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात शेळी व मेंढ्यांची आवकदेखील वाढली आहे. शेतरान उजाड झाल्याने मेंढपाळांपुढे मेंढ्या चारण्याचा प्रश्‍नही जटिल बनला आहे.

"चारा नसल्याने नाइलाजास्तव जनावरे विकावी लागत आहेत. सुका चारा संपलेला आहे. पाण्याचा प्रश्‍नही कायम आहे. ग्रामीण भागात रोजगार नाही. दुष्काळी परिस्थिती शासनाने पशुधन वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात." - रवींद्र कन्नोर, निमशेवडी, ता. मालेगाव

"शासनाने मेंढपाळ बांधवांसाठी शासकीय वनजमिनींमध्ये गुरांसाठी पाणवठा तयार करावा. जनावरांच्या चारा छावण्या सुरु कराव्यात. तसेच चारा छावण्यांच्या बाजूला पशुधन मालकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करावी. चारा छावण्यांसाठी जागा नसल्यास मेंढपाळांना शासकीय अनुदान उपलब्ध करुन द्यावे." - आर. पी. कुवर, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव

"दुष्काळी परिस्थितीत बाजारात जनावरे विक्रीसाठी येत आहेत. मात्र त्यांना पुरेसे ग्राहक नाहीत. मालेगाव बाजार समितीत जनावरांच्या बाजारातील उलाढाल दर आठवड्यात दहा लाखाने घटली आहे. शासनाने विना विलंब पंचायत समिती गण निहाय चारा छावण्या सुरु करून पशुधन वाचवावे." - विनोद चव्हाण, उपसभापती, कृऊबा, मालेगाव

Animals brought for sale in the market within the premises of the committee.
Nashik News : भोजापूर धरणात 98 टक्के पाणीसाठा; पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.