Nashik News : जलकुंभांना नावे देण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये रस्सीखेच; संघर्षाची स्थिती

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरात उभारलेल्या ४२ जलकुंभांना नाव देण्यासाठी आमदारांसह माजी नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे.
water tank ( file photo )
water tank ( file photo )esakal
Updated on

Nashik News : महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरात उभारलेल्या ४२ जलकुंभांना नाव देण्यासाठी आमदारांसह माजी नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे.

त्यातून संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, भाजपच्या माजी नगरसेवकांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रस्ताव धुडकविण्यासाठी दबाव आणला जात आहे. (tussle among public representatives to name water bodies nashik news)

गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणातून बावीस लाख लोकसंख्येच्या नाशिकला पाणीपुरवठा होतो. मुकणेचे पाणी पाथर्डी, विल्होळी, इंदिरानगर, सिडकोचा काही भाग, तसेच मुंबई नाका भागापर्यंत पोचते. तर दारणा धरणाचे पाणी नाशिकरोड भागासाठी वापरले जाते. उर्वरित शहराला गंगापूर धरणाचे पाणी पोचते.

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई वगळता राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत आरक्षित केले जाणारे व पाण्याची उपलब्धी अधिक आहे. असे असताना शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागातून पाण्याची ओरड होतेच. पाणी अधिक असले तरी नियोजनाचा अभाव व बूस्टर सिस्टम याला कारणीभूत आहे. शहरात सध्या एकूण ११८ जलकुंभाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.

पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्याच्या अनुषंगाने नव्याने जवळपास ३० जलकुंभ बांधण्यात आले आहे. वास्तविक शहरात ९४ ते ९५ जलकुंभाच्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होवू शकतो. फक्त नियोजनाची आवश्‍यकता आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात शहरात जलकुंभाची उभारणी केली आहे, मात्र त्या जलकुंभांना सध्या नावे देण्यासाठी स्पर्धा लागली आहे.

water tank ( file photo )
Nashik News : शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार

नावे देण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांकडून नामकरण प्रस्ताव परस्पर दाखल होत आहे, तर आमदारांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होत आहे. जलकुंभाला नावे देताना प्रशासनाची कसरत होत आहे. जवळपास ४२ जलकुंभांना नावे देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.

माजी नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाले आहे. जुने नाशिकमधील जलकुंभाचा असाच वाद सध्या विकोपाला गेल्यानंतर अखेर महापालिकेने त्यावर तोडगा काढत महासभेच्या मंजुरीचा ठराव अंतिम करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नामकरण निश्चित केले आहे.

नानावली जलकुंभावरून वाद

पूर्व विभागातील सर्वे क्रमांक ४०६ /४०७ मध्ये माजी नगरसेविका रंजना पवार यांच्या प्रस्तावानुसार जलकुंभ तयार करण्यात आला. या जलकुंभाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाव द्यावे, असादेखील प्रस्ताव त्यांचा होता. त्यानुसार प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुफी जीन यांनी रहिमतुल्ला आलेरहेमा नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता.

water tank ( file photo )
Nashik News : निळ्या पूररेषेत बांधकाम परवानगीवर बंदी! विभागीय आयुक्तांच्या स्पष्ट सूचना

तोदेखील प्रस्ताव मंजूर करून ठरावात रूपांतर झाले. एकाच जलकुंभाला दोन नावे दिल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्याचा ठराव संमत करावा, अशी मागणी केली होती. महापालिकेने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नामकरणाचा ठराव संमत केला आहे.

विभागनिहाय जलकुंभ

विभाग संख्या

पूर्व १५

पश्चिम १८

पंचवटी २५

नाशिक रोड १६

सिडको २९

सातपूर १५

एकूण ११८

water tank ( file photo )
Nashik News: शल्‍यचिकित्‍सकांना अद्ययावत प्रशिक्षण, सामाजिक जाणिवेतून उपक्रमांचे आयोजन : डॉ. महेश मालू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.