Winners in various categories of the TVS Ntork NASA Monsoon Scooter Rally were felicitated with the contestants present.
Winners in various categories of the TVS Ntork NASA Monsoon Scooter Rally were felicitated with the contestants present.esakal

TVS Ntorq NASA Monsoor Scooter Rally : सय्यद आसिफ अली ठरला विजेता

Published on

नाशिक : अत्‍यंत खडतर रस्‍त्‍यातून वाट शोधत, पावसाच्‍या सरींना झेलत मार्गक्रमण करतांना स्‍पर्धकांचे कसब पणाला लागले होते. वळणदार रस्‍त्‍यांवर तोल सांभाळताना, स्‍पर्धक चालकाला मागे टाकण्याची चढाओढ शनिवारी (ता.१७) बघायला मिळाली.

औचित्‍य होते सारुळ गावातील दगडांच्‍या खाणीच्‍या परिसरात झालेल्‍या टीव्‍हीएस एनटॉर्क नासा मान्‍सून स्‍कूलर रॅलीचे. नाशिकच्‍या फेरीत सय्यद असिफ अली याने चमकदार कामगिरी करताना विजेतेपदाला गवसणी घातली. (TVS Ntorq NASA Mansoon Scooter Rally Syed Asif Ali win Nashik Latest Marathi News)

स्पर्धेचा शुभारंभ विल्होळी येथील केव्ह्ज काऊंटी रिसॉर्ट येथे शनिवारी सकाळी नऊला झाला. सारूळच्या दगड खाणी परिसरात झालेल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद नाशिकच्या क्रीडाप्रेमी, स्‍थानिकांनी घेतला. स्‍पर्धेदरम्‍यान पावसाच्‍या हजेरीने उत्‍साह वाढविला होता. स्‍पर्धा मार्गातील साचलेल्‍या तळ्यांतून भरधाव जाणाऱ्या दुचाकीचा थरार उपस्‍थितांनी अनुभवला.

पुणे येथून आलेल्या दीक्षा श्रीवास्तव स्‍पर्धेतील एकमेव महिला स्पर्धक होत्‍या. उत्‍साहात सहभागी झालेल्‍या दीक्षाचे पहिल्याच फेरीत वाहन नादुरुस्त झाल्याने ती स्पर्धेतून बाद झाली. विविध गटातील विजेत्‍या स्‍पर्धकांना सुरेश पाटील, राजारामन, हेमा पटवर्धन, प्रवीण मराठे, ज्योत्स्ना कंसारा, राजवर्धन देवरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. स्‍पर्धेत सर्वसाधारण विजेता सैयद असिफ अली ठरला. तर व्यंकटेश शेट्टी द्वितीय आणि कार्तिक नायडू तृतीय स्‍थानी राहिला. प्रथमच सहभागी म्हणून तेजस कदम यांना गौरवण्यात आले.

Winners in various categories of the TVS Ntork NASA Monsoon Scooter Rally were felicitated with the contestants present.
मृतदेहासाठी तिरडी बांधणे एक "अनमोल सामाजिक दायित्व"
टीव्‍हीएस एनटॉर्क नासा मान्सून स्‍कूटर रॅलीतील थरारक क्षण
टीव्‍हीएस एनटॉर्क नासा मान्सून स्‍कूटर रॅलीतील थरारक क्षणesakal

गटनिहाय निकाल असे-

(अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय)

-क्लास ३ स्कूटर २१० सीसी ग्रुप बी : सैयद असिफ अली, कार्तिक नायडू, नीरज वांजळे.

-क्लास ४ स्कूटर २१० सीसी ग्रुप बी : व्यंकटेश शेट्टी, मोहसीन फ़की, आकाश सातपुते.

- क्लास २ स्कूटर ८० सीसी ते ११५ सी सी ग्रुप बी : हितेश ठक्कर.

- क्लास १ स्कूटर ८० सी सी ते ११५ सी सी ग्रुप बी : नीलेश ठाकरे, रोहन ठाकूर, कौस्तुभ मत्से.

Winners in various categories of the TVS Ntork NASA Monsoon Scooter Rally were felicitated with the contestants present.
Leopard Attack : सोनजांब येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()