Shabari Gharkul Yojna News : 25 हजार घरकुलांचे वाटप व्हायला हवे : पालकमंत्री दादा भुसे

Shabri Gharkul Yojna Update
Shabri Gharkul Yojna Updateesakal
Updated on

Nashik News : आदिवासी विकास विभागातील शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडे जातीचा दाखला नसल्याने जिल्ह्यातील तब्बल तीन हजार ६०२ प्रस्ताव रद्द झाल्याने या व्यक्तींचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे.

आता ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेच्या माध्यमातून जागेवर दाखला मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, येत्या ८ जुलैला मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या हस्ते २५ हजार घरकुल वाटप व्हायला हवे, असे ‘टार्गेट’ राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले. (Twenty five thousand houses should be distributed Hit for lack of caste certificate guardian minister gave target of 25 thousand for Shabari Gharkul Nashik News)

जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (ता. २५) शबरी घरकुल योजनेची आढावा बैठक त्यांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, कळवणचे विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत आठ हजार ५१६ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवलेले होते. त्यात सात हजार २३१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातूनही केवळ तीन हजार ६२९ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. अजूनही या विभागाला एक हजार १४५ प्रस्तावांची आवश्यकता आहे. प्राप्त प्रस्तावांमध्ये लाभार्थ्याकडे जातीचा दाखला नसल्याने बहुतांश प्रस्ताव रद्द झाले आहेत.

Shabri Gharkul Yojna Update
Nashik Crime News : दरेगावला तरुणाची आत्महत्या; बांधकाम व्यावसायिकसह एकाविरुद्ध गुन्हा

ज्या लाभार्थ्यांना दाखला देण्यास अडचण आहे, असे प्रस्ताव सोडून इतर लाभार्थ्यांना जागेवर जातीचा दाखला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्यामार्फत तहसीलदार, प्रांत अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांना त्वरित दाखले देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

शासन आपल्याला पाहिजे तेवढी घरे उपलब्ध करून द्यायला तयार आहेत, पण आपण ‘टार्गेट’पर्यंतही पोचत नसल्याने घरकुलांपासून गरिबांना वंचित ठेवत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत घरकुलांची संख्या २५ हजारांपर्यंत पोचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मनरेगा’अंतर्गत गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात २५० बंधारे बांधण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले. १७९ शाळांना संरक्षण भिंतही उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी अंगणवाड्यांच्या नवीन अत्याधुनिक इमारतीविषयी माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shabri Gharkul Yojna Update
Nashik Accident News : समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात; कार थेट जाऊन पडली अंडरपासमध्ये

अतिरिक्त प्रस्ताव तयार करा

घरकुलांचे प्रस्ताव हे टार्गेटच्या उद्देशाने न मागविता लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी अतिरिक्त प्रस्ताव तयार ठेवा. राज्य सरकार पाहिजे तेवढे घरकुले देण्यास तयार आहे, आपणच प्रस्ताव सादर करायला कमी पडायला नको म्हणून अतिरिक्त प्रस्ताव तयार ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

शबरी घरकुल योजनेची सद्यःस्थिती

तालुका ...... प्राप्त प्रस्ताव .... पात्र ... अपात्र

नाशिक ....... ७८३ ....... ५२५ ...... २५८

पेठ..........४३९.......४००.......३९

दिंडोरी......७२०......६२२.......९८

इगतपुरी....४६४......३७७.......८७

सिन्नर.......४१........३७.......०४

त्र्यंबकेश्वर..४२१......३२६.....९५

निफाड....४६२......६७.....३९५

येवला....१६३......१३०...३३

बागलाण..९१८.....२९....८८९

चांदवड...२०८....००....२०८

देवळा...१८५....१६९...१६

कळवण...८७१...४२३...४४८

मालेगाव...४३५...२९९..१३६

नांदगाव...२३८...००....२३८

सुरगाणा...८८३...२२५...६५८

एकूण...७२३१...३६२९...३६०२

Shabri Gharkul Yojna Update
Nashik Accident News : दुचाकी अपघातात एक ठार; दोन जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.