सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव शिवारात वावी पोलिसांच्या गस्ती पथकाने वाहनांमधील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
मात्र, डिझेल चोरी करण्यासाठी वापरले जाणारे वाहन व हजारो रुपयांचा डिझेलचा साठा पोलिसांनी जप्त केला. दरम्यान या घटनेचा तपास करत असताना दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. (Two arrested for stealing diesel from vehicles Diesel worth thousands of rupees vehicle seized Nashik News)
वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे, योगेश शिंदे, पोलिस नाईक नितीन जगताप यांचे पथक गस्त करुन सिन्नर - शिर्डी रोडने परत येत होते.
मिरगाव शिवारात हॉटेल बाबा परिवारच्यासमोर रस्त्याच्या कडेला एक आयशर (युपी ४५ एटी ३४९८) उभी दिसली. तिच्या शेजारी एक अज्ञात इसम उभा होता. तसेच, आयशर गाडीसमोर एक पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद उभी असल्याचे दिसले.
गस्तीपथकाला संशय आल्याने पोलिसांनी आपले वाहनाची तपासणी केली. आयशरशेजारी उभा असलेला संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी त्यांची कार (एमएच ०२ डीएस ३७२१) ची तपासणी केली.
कारच्या डिकीत डिझेल भरलेले व रिकामे प्लॅस्टिकचे ड्रम व दोन प्लास्टिकच्या नळ्या असे डिझेल चोरण्याचे साहित्य, अरबाज शेख या नावाचे आधारकार्ड व बँकेचे कागदपत्र मिळून आले.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
आधार कार्ड वरून पोलिसांनी कार मालकाचा छडा लावला. तो मूळचा श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो फरार आहे. या घटनेदरम्यान तांत्रिक तपास करताना पोलिसांना दोघा संशयितांपर्यंत पोहोचणे शक्य झाले.
मस्तान शेख (वय २१ रा. मदर तेरेसा चौक, कोर्टासमोर, श्रीरामपूर) नकुल धर्मराज ठाकरे (वय २२ रा. एस जी विद्यालय जवळ, इंदिरानगर चौफुली, कोपरगाव) या दोघांना पोलिसांनी डिझेल चोरीच्या प्रकरणात अटक केली.
हे दोघेही सराईत गुन्हेगार असून शेख याचे विरुद्ध चार तर ठाकरे याच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.