दोन सख्ख्या भावांचा एमपीएससीत डंका! साकारले आई-वडिलांचे स्वप्न

Two brothers from Yeola passed the MPSC exam marathi news
Two brothers from Yeola passed the MPSC exam marathi newsSakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : कुटुंबातील संस्कार…,शिक्षकांसह आई-वडिलांचे मार्गदर्शन…विद्यार्थ्यांची जिद्द व महत्वकांक्षा जुळून आले, की यश चालून येते हे सिद्ध केले आहे ते येथील दोन सख्ख्या भावांनी… महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन येथील देवेंद्र कुऱ्हे व डॉ. रोहित कुऱ्हे यांनी उच्च पदाला गवसणी घातली आहे.

येथील पशुवैदयकीय अधिकारी डॉ. सतीश कुऱ्हे व नाशिक जिल्हा दूध संघांच्या माजी अध्यक्षा, विदयमान संचालिका कल्पना कुऱ्हे यांचे हे दोघे सुपुत्र आहेत. मुलांनी काहीतरी वेगळे करावे ही आई-वडिलांची पहिल्यापासूनची इच्छा. देवेंद्र कुऱ्हे हे २०१६ ची राज्य कर निरीक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या नाशिक येथील वस्तू व सेवाकर भवन येथे कार्यरत आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता २०१९ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देत नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. दुसरे बंधू डॉ. रोहित कुऱ्हे हे नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. त्यांची पशुधन विकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या पदावर निवड झाली आहे. डॉ. रोहित कुऱ्हे हे शिरवळ (जि. सातारा) येथील पशुवैदयकीय महाविदयालयातून पदवीधर झाले आहे. ते सध्या पीएचडीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. देवेंद्र व डॉ.रोहित या दोघा भावांच्या या यशाचे कौतुक होत आहे.

Two brothers from Yeola passed the MPSC exam marathi news
नांदायला येत नाही म्हणून हत्या; भर बाजारात चिरला गळा

आपल्या मुलांनी चांगले शिकावे, उच्चपदावर नोकरी करावी हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते.आमच्या या स्वप्नांची मुलांनी पूर्ती केली असून हे त्यांच्या परिश्रमाचे व जिद्दीचे यश आहे.त्यांचे यश आमच्यासाठी आनंददायी व अभिमानास्पद आहे."
-डॉ. सतीश कुऱ्हे, पशुवैद्यकीय अधिकारी, येवला.

Two brothers from Yeola passed the MPSC exam marathi news
पुढच्या महिन्यात येतेय Tata ची CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.