दोस्तीचा हात कायमचा सुटला; सिन्नर शिर्डी रस्त्यावरील घटना

friends
friendsesakal
Updated on

सिन्नर (जि.नाशिक) : सचिन चकोर (वय २८) आणि शिवम पांडुरंग गिते (वय १८) हे दोघेही जीवलग मित्र...त्यातील सचिन हा सर्पमित्र व पक्षीमित्र होता. त्याने आयुष्यभर अनेक जखमी पक्षांना बरे करुन परत त्यांना जीवदान दिले. पण अजून आयुष्याचा एक टप्पाही पार केला नाही. तोवर त्यांच्या नशिबी हे दुर्दैव आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आयुष्यभर जखमी पक्षांना जीवदान, मैत्रीचा करूण अंत

सचिन त्र्यंबक चकोर (२८, रा. संजीवनीनगर, सिन्नर) व त्याचा मित्र शिवम पांडुरंग गिते (१८, रा. ढोकेनगर, सिन्नर) हे दोघे मित्र त्यांच्या पल्सर दुचाकीने ( एम.एच.१५ एफ डब्लू ७८६२) मुसळगावकडून सिन्नरकडे येत होते. पण त्याच वेळी काळाची झडप आली. आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. समोरून भरधाव येणा-या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यातील मृत सचिन चकोर हा सर्पमित्र व पक्षीमित्र होता. त्याने अनेक जखमी पक्षांना बरे करुन परत त्यांना जीवदान दिले. दोघा मित्राच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करीत आहेत.

friends
नाशिक : कांद्याच्या दरात अखेर वाढ! शेतकऱ्यांना फायदा कमी

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील घटना

सिन्नर-शिर्डी महामार्गावर (sinner-shirdi highway) सिन्नरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने पल्सरला जोरदार धडक दिल्याने दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. जुन्या केला कंपनीजवळ मंगळवारी (ता.२१) रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

friends
नाशिक: भाजपच्या असंतोषाला राष्ट्रवादीकडून खतपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.