Nashik Crime News: दोन गटांत तुफान राडा; फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन गटात जोरदार राडा
Nashik Crime News
Nashik Crime NewsEsakal
Updated on

नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात जोरदार राडा झाला आहे. फ्री स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महाकाली चौकातील ही घटना आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. टोळक्याकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.  (Marathi Tajya Batmya)

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील महाकाली चौकातील क्रिडांगणात चार दिवसांपूर्वी दोन गटात तुफान हाणामारी झाली असून या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा अंबड पोलिसांचा गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक शिल्लक राहिला नसल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

Nashik Crime News
Maharashtra Politics: 'कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं अन् कोणाला कधी...', भाजपा आमदाराचं मोठं वक्तव्य

सिडको परिसरात एका तरुण व्यवसायिकावर आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयता, चॉपरने प्राणघातक हल्ला केला. तर त्याच्याकडे असलेल्या रिक्षाचीही तोडफोड केली होती. ही घटना घडत नाही तोच अवघ्या काही तासातच पुन्हा दोघांनी हेडगेवारनगर येथे पंधरा गाड्यांची तोड फोड करीत दहशत माजावण्याचा प्रयत्न केला. (Marathi Tajya Batmya)

Nashik Crime News
Maharashtra Cow Milk Price: राज्यातील दूध उत्पादकांना सरकारकडून दिलासा, गायीच्या दूधाला मोठी दरवाढ

तर हे प्रकार घडण्याआधी दिनांक १० सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील महाकाली चौकत वीस ते पंचवीस जणांचा टोळका महाकाली चौकाच्या मैदानात आला.आपापसातील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सुदैवाने या मारहाणीत कोणासाही गंभीर मार लागला नसला तरी मात्र या युवकांच्या मनात पोलिसांचा कुठलाही वचकच शिल्लक राहिला नसल्याच्या संताजनक प्रतिक्रिया स्थानिकांकडून येत आहे.(Latest Marathi News)

वारंवार घडणाऱ्या घाटंणांमुळे सिडको परिसरातील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून येथे कधी काय घडेल. याची किंमत सर्वसामान्य सिडको वासियांना मोजावी लागेल याचा काही भरोसा नसून पोलिसांनी त्यांच्या खाकीचा धाक या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण करणे अत्यावश्यक असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.(Latest Marathi News)

Nashik Crime News
Maharashtra Assembly Session: राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमदारांना व्हीप बजावण्याची शक्यता; अधिवेशनात कोणाचा व्हिप चालणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.