Nashik News : अंजनेरी प्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित; मित्तल यांचा दणका

Two medical officers suspended in Anjaneri case of mother done pregnant daughter delivery nashik news
Two medical officers suspended in Anjaneri case of mother done pregnant daughter delivery nashik newsesakal
Updated on

नाशिक : अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्‍वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदार आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने आईनेच मुलीची प्रसूती केल्याची घटना घडली. (Two medical officers suspended in Anjaneri case of mother done pregnant daughter delivery nashik news)

या घटनेची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेतली आहे. या वेळी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनवणे (कायमस्वरूपी) आणि डॉ. आशिष सोनवणे (कंत्राटी) यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणेस दिले आहेत. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. ५) सकाळी नऊच्या सुमारास यशोदाबाई त्र्यंबक आव्हाटे (रा. बऱ्याची वाडी) त्यांची आई सोनाबाई वाळू लचके यांच्यासह पोचल्या.

रविवार असल्याने गर्दी कमी होती आणि आरोग्य केंद्राच्या इमारतीचा दरवाजा बंद होता. त्या वेळी आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. मुलगी यशोदा हिच्या पोटात कळा येत असल्याने आई सोनाबाई तिला स्वतः लेबर रूममध्ये घेऊन गेल्या. तेथे तिची प्रसूती केली.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Two medical officers suspended in Anjaneri case of mother done pregnant daughter delivery nashik news
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने झोडपले; रब्बीं पिकांचे मोठे नुकसान!

प्रसूतीनंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर आरोग्य केंद्रात सेवेस असलेल्या आरोग्यसेविका दाखल झाल्या. या घटनेची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी प्राथमिक चौकशी केली. यात आरोग्य केंद्रावर दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.

यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पूर्वपरवानगी न घेता परीक्षेसाठी गेलेले होते. तर कायमस्वरूपी असलेले वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. येथील आरोग्यसेविका परवानगीने शेजारील गावात उपचारासाठी गेलेल्या होत्या. या चौकशीअंती मित्तल यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश आरोग्य विभागास देत कारवाई केली आहे.

त्रिसदस्यीय समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी या प्रकरणानंतर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. यापुढे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असे प्रकार घडतील, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याचा निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जाईल. तसेच त्रिसदस्यीय समिती गठित करून गुन्हे देखील नोंदविण्यात येईल. आरोग्य यंत्रणेत हलगर्जीपणा टाळण्यासाठी आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

दोन महिन्यांत तीन प्रकरणे

मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची मित्तल यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून, अशी तीन प्रकरणे झाली आहेत. चिखलओहोळ (ता. मालेगाव) आरोग्य केंद्रात हलगर्जीमुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. दोन आठवड्यापूर्वी नांदगाव तालुक्यातही एका आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. तर राजापूर (ता. येवला) आरोग्य केंद्रात असाच काहीसा प्रकार घडला होता. आता अंजनेरी आरोग्य केंद्रात कोणीही उपस्थित नसल्याने हा प्रकार घडला आहे

Two medical officers suspended in Anjaneri case of mother done pregnant daughter delivery nashik news
Unseasonal Rain : अवकाळीचा ‘शिमगा’; उत्तर महाराष्ट्राला जबर फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.