Accident : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कळवणला तब्बल अडीच तास रस्ता रोको

Officers and citizens of traders association during Rasta Roko protest
Officers and citizens of traders association during Rasta Roko protestesakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : कळवण मानूर रस्त्यावरील पुलावर काल दि ९ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद म्हणून आज व्यापारी असोसिएशन व कळवण शहरातील त्रस्त नागरिक नागरिकांनी संभाजी नगर गावठाण परिसरात सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्तेकामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Two people killed in accident on Kalwan Manur road bridge Rasta roko protest nashik news)

व्यापारी असोसिएशनच्यावतीने देण्यात निवेदनात म्हटले आहे की, कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. या कामाबाबत अनेक राजकीय पक्ष, संघटना , व्यापारी असोसिएशन यांनी वेळोवेळी आंदोलन करून काम त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र ठेकेदार व संबंधित अधिकारी संगनमताने विलंब करीत आहेत. या दिरंगाईमुळे रस्त्याची एकतराफा वाहतूक सुरु आहे.

यामुळे कळवणकर व बाहेरील वाहनचालकांना हकनाक वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. यामुळे छोटे अपघात वाहन चालकांमध्ये वादविवाद नित्याचेच झाले आहेत. व्यापारी असोसिएशनने केलेल्या आंदोलनावेळी संबंधित कार्यकारी अभियंता यांचे उपस्थितीत ठेकेदाराने ४५ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र साडे २चार महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री व आमदार असून पोरका झाला असल्याची खंत व्यक्त केली आहे.

सध्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदिमाया श्री सप्तशृंगी देवीचा नवरात्रौउत्सव सुरु आहे. काल दि ९ सप्टेंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असल्याने देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने पुलले आहेत. असे असतांना स्थानिक पोलिसांकडूनही वाहतुकीचे नियोजनाचा अभाव नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. ह्या मेनरोडचे काम एकदिवस नक्की एखादा बळी घेईल अशी चर्चा असतांना काल सायंकाळी यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय येवले आपल्या घरून अल्पबचत कलेक्शनसाठी निघाले असतांना बेहडी नदीच्या पुलावर साक्री डेपोच्या बस क्रमांक एम एच २० बीएल २४९८ या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत जात याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या अजय येवले, प्रकाश भोये व एक भाविक या तिघांनाही चिरडले घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, अजय येवले याना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

Officers and citizens of traders association during Rasta Roko protest
बसमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव

तर प्रकाश भोये याना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठवले भोये यांचाही नाशिककडे जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. मात्र तिसरा जखमी व्यक्ती कोणत्या दवाखान्यात उपचारासाठी गेला याबाबत कोणालाच माहिती नसल्याचे समजते. याबाबत कळवण पोलिसात मोटर अपघात बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान आज संतप्त व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी आज आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवत सकाळी ९ वाजता संभाजी नगर परिसरात कळवण नाशिक रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सदर अपघातास जवाबदार असणाऱ्या बस चालक, रस्ते कामाचे ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आले. दोनही बाजूची दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

या आंदोलनात व्यापारी असोसिएशनचे मोहनलाल संचेती, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, माजी जिप सदस्य शैलेश पवार, माजी नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, छावा संघटनेचे प्रदिप पगार, माकपाचे सरचिटणीस मोहन जाधव, शिंदे गटाचे जितेंद्र पगार, शरद पगार, रोटरी क्लबचे सेक्रेटरी रविंद्र बोरसे, लक्ष्मण खैरनार, भाजपचे विकास देशमुख, संदीप अमृतकार यांचेसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

Officers and citizens of traders association during Rasta Roko protest
Bus Fire Accident : मिर्ची हॉटेल चौफुलीवर हम्प बसवावा; नागरिकांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()