NMC News : कर न भरल्यास जुलैपासून 2 टक्के शास्ती; अडीच महिन्याच्या कालावधीत 77 कोटीची वसुली

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : महापालिकेकडून एकरकमी आगाऊ मालमत्ता कर अदा करणाऱ्या ग्राहकांसाठी सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये ७७ कोटी रुपयांची वसुली झाली असून, १ जुलैपासून नियमितपणे मालमत्ता करावर दोन टक्के दंड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Two percent penalty for non payment of tax from July 77 crore recovered in period of two and a half months Nashik News)

२०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या विविध कर विभागाकडून कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ ते १६ जून २०२३ या अडीच महिन्यातील कालावधीत ७७ कोटी दोन लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

एप्रिल महिन्यात एक लाख २७ हजार ९६५ कर दात्यांनी आठ टक्के सवलतीचा लाभ घेतला. मे महिन्यात २९ हजार ६९५ करदात्यांनी सहा टक्के सवलतीचा लाभ घेतला. एक जून ते सोळा जून या कालावधीत ३० हजार १३३ करदात्यांनी तीन टक्के सवलतीचा लाभ घेतला.

जून महिन्याचे पंधरा दिवस शिल्लक आहेत. ३० जूनपर्यंत कर भरून सवलतीचा लाभ घेण्याबरोबरच महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाचा प्रयोग फसला! 45 दिवस मुदतवाढ देण्याची नामुष्की

इंडेक्स क्रमांकावर सवलतीचा लाभ
मालमत्ताधारकांच्या चालू बिलावर किंवा थकबाकीवर १ जुलै २०२३ पासून दोन टक्के दंड लागू होणार आहे. ज्या नागरीकांना घरपट्टीचे बिले मिळालेली नाहीत. त्यांना मागील वर्षाच्या बिलाच्या इंडेक्स क्रमांकावर सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

चालू आर्थिक वर्षांपासून काही विशिष्ट बाबींवर महापालिकेने गृहनिर्माण संस्था, मालमत्ताधारकांना सवलत जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त ऑनलाइन संपूर्ण कराचा भरणा केल्यास सवलतीसह सर्वसामान्य करामध्ये पाच टक्के किंवा जास्तीत जास्त तीन हजार रुपयांची सवलत मिळणार आहे.

ज्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक मालमत्ता कराशी (प्रॉपर्टी टॅक्स) जोडले गेले आहेत. त्या मोबाईल क्रमांकावर महापालिकेने व्हॉट्सअप किंवा एसएमएसद्वारे थकीत रक्कम आणि पेमेंट गेटवेची लिंक उपलब्ध करून दिली आहे.

NMC Nashik News
NMC School Opening: पहिल्याच दिवशी सेवेत ‘स्मार्ट’ क्लासरूम! 68 शाळांमध्ये प्रकल्प

अशी आहे सवलत योजना
- सौर ऊर्जा (गरम पाणी, वीज) -५ टक्के
- पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) -५ टक्के
- सांडपाण्याचा पुनर्वापर - ५ टक्के
- इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन- 2 टक्के

NMC Nashik News
NMC School : विद्यार्थी गणवेषाचा प्रश्न मार्गी; अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.