नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

दोघा संशयितांकडून एक इंजेक्शनची बाटली जप्त केली आहे.
Tocilizumab Injection
Tocilizumab InjectionGoogle
Updated on

नाशिक : कोरोना उपचारासाठी अत्यावश्यक गटात समाविष्ट ‘टॉसिलिझुमॅब’ (tocilizumab) या इंजेक्शनचा काळा बाजार करताना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गंगापूर रोड परिसरात फार्मसीच्या (Pharmacy) दोन विद्यार्थ्यांना अटक केली. दोघा संशयितांकडून एक इंजेक्शनची बाटली जप्त केली आहे. दोघा संशयितांना तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. (Two pharmacy students arrested on suspicion of black marketing tocilizumab injections)

४० हजार ६०० रुपये किमतीचे एक इंजेक्शन जप्त

बुधवारी (ता. ५) गंगापूर रोडवर एका रुग्णालयाच्या बाहेर इंजेक्शनचा काळा बाजार करण्यासाठी काही संशयित येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी सापळा रचला. बनावट ग्राहक तयार करून बोलविण्यात आले. स्विफ्ट कार (एमएच १५, एफएन ५०५५)मधून संशयित प्रणव केशव शिंदे (वय २४, लक्ष्मणरेखा सोसायटी, पंचवटी), संकेत अशोक सावंत (२५, रा. न्यू तेजश्री अपार्टमेंट, मखमलाबाद नाका, पंचवटी) आले. बनावट ग्राहकाने मागणी करत इंजेक्शन ताब्यात घेतले असता अन्न व औषध प्रशासनासाच्या निरीक्षकांनी कारमध्ये बसलेल्या तरुणांना औषधविक्रीचा परवाना मागितला असता त्यांनी नकार दिला. पोलिसांनी कारला घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले. या वेळी प्रणवच्या अंगझडतीत ४० हजार ६०० रुपये किमतीचे एक इंजेक्शन पोलिसांना मिळाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली तीन लाखांची मोटार, आठ हजारांची रोख रक्कम, महागडे मोबाईल असा सुमारे चार लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख (४५) यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत असून, त्यांनाही लवकर अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक आंचल मुदगल यांनी सांगितले.

Tocilizumab Injection
संदीप गुळवे पुन्हा स्वगृही; जिल्हा कॉंग्रेसला येणार अच्छे दिन?

नामांकित महाविद्यालयात शिक्षण

प्रणव व त्याचा एक मित्र हे दोघे शहरातील एका नामांकित महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत आहेत. या दोघांसोबत त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी मिळून नातेवाइकांसाठी आणलेल्या इंजेक्शनपैकी उरलेले एक इंजेक्शन सोशल मीडियाद्वारे गरजूंसोबत संपर्क साधत दोन लाख ६० हजारांना विक्री करण्याचे निश्चित केले होते, असा पोलिसांचा संशय आहे.

गुन्ह्यात फरार असलेल्या दोघांचा शोध सुरु चौघांपैकी कोणाचे मेडिकल आहे काय, याचाही शोध सुरू आहे. तुर्तास अटक आरोपींना कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्यांनी असे प्रकार केलेत काय, विकण्यासाठी इंजेक्शन कोठून आणले अशा प्रश्नांची उत्तरे आरोपींच्या चौकशीत समोर येतील.

-डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Tocilizumab Injection
रशियाच्या तिन्ही लशींपासून मिळणार सुरक्षाकवच? मृत्यूची शक्यता जवळपास कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()