Nashik Crime News : बसचालकाला मारहाण प्रकरणी दोघांना शिक्षा

crime news
crime newsesakal
Updated on

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावर पळसे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करून वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची सक्ती मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच, प्रत्येकी दहा हजारांचा दंडही ठोठावला आहे. (Two sentenced for assaulting bus driver Nashik Crime News)

गणेश उर्फ गण्या अशोकराव गायधनी (३५, रा. पळसे), बाळू पूंजा चौधरी (३७, रा. कारखानारोड, पळसे) अशी आरोपींची नावे आहेत. बसचालक रवींद्र नारायण गारकर (रा. कोळपड, ता. राहता, जि. नगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १७ मार्च २०१६ रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पळसे येथे आरोपी दोघांनी परिवहन महामंडळाच्या बसवर (एमएच १४ बीटी ४३७६) दगडफेक करून बसच्या पुढील व मागील काचा फोडल्या.

तसेच, बसवाहक निलेश इंगळे यांना मारहाण करीत बसच्या प्रवाशांमध्ये घोषणाबाजी करीत दहशत माजविली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

crime news
Nashik Crime News : अखेर रॉलेट गेमवर लाखो रुपये हरलेला सोमनाथ सापडला जालन्यात!

सदरील गुन्ह्याचा तपास हवालदार शाम जाधव यांनी करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश एम.ए. शिंदे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर.एम. बगदाणे यांनी कामकाज पाहात पंच,साक्षीदार तपासले.

परिस्थितीजन्य पुराव्यांसह न्यायालयाने आरोपी दोघांना दोन वर्षांची सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून एस.ए. पवार, के.एस. दळवी यांनी पाठपुरावा केला.

crime news
Nashik Crime News : अखेर रॉलेट गेमवर लाखो रुपये हरलेला सोमनाथ सापडला जालन्यात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.