मालेगाव : शहरातील नयापुरा भागात दुचाकी खरेदी-विक्री करणाऱ्या तरूणाला मारहाण करून गावठी कट्टा व लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून चौघांनी खंडणी मागण्याचा प्रकार घडला.
आझादनगर पोलिसांनी शस्त्रांचा धाक दाखविणाऱ्या दोघांना संशयितांना अवघ्या २४ तासात अटक केली आहे. अन्य दोघे संशयित फरार झाले आहेत. दुचाकी व्यवहाराचे पैसे बाकी नसताना दुचाकीच्या पैशांचे निमित्त करून चौघांनी संशयिताकडे खंडणी मागितली होती. (Two wheeler agent for extortion Two arrested within 24 hours Both absconding Nashik Crime)
या प्रकरणी आसिफ शेख सलीम (३९, रा. हिंदुस्थान बिल्डींग, नयापुरा) हा त्याच्या फरहान हिंदुस्थान या नयापुरा भागातील कार्यालयात एकटा बसलेला असताना शारीक ख्वाजा, वकार ख्वाजा (दोन्ही रा. नयापुरा, गल्ली नं. १३), मोहम्मद इम्रान उस्मान गणी (३५, रा. ओवाडी नाला, पवारवाडी), सुभान अहमद मिसार अहमद (३६, रा. नयापुरा) हे कार्यालयात आले.
आसिफ शेख याच्याकडे युनिकॉर्न दुचाकीच्या व्यवहाराचे पैसे बाकी नसताना त्याच्याकडे चौघांनी पैशांची मागणी केली. आसिफने नकार देण्यापुर्वीच दोघांनी त्याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
मोहम्मद इम्रानने गावठी कट्ट्याचा, तर सुभान अहमदने लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नयापुरा भागात १३ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. आझाद नगर पोलिसांनी १४ तारखेला इम्रान व सुभानला अटक केली.
आसिफ शेख यांच्या तक्रारीवरुन आझादनगर पोलिस ठाण्यात खंडणी व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक चव्हाण व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. आझादनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघा संशयितांना अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.