Nashik News : वणी- सापूतारा रस्त्यावर बसने दुचाकीस चिरडले; चिमुरडीसह पती- पत्नी ठार

accident
accident sakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : वणी - सापूतारा रस्त्यावर खोरीफाट्या नजिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील पती - पत्नीसह आठ वर्षीची चिमुरडी ठार झाली आहे. तर बसमधील पाच प्रवासी जखमी झाले आहे. (Two wheeler crushed by bus on Vani Saputara road Husband and wife along with little girl killed Nashik News)

वणी - सापूतारा रस्त्यावरील खोरीफाट्या नजिक कळवण आगाराच्या सुरगाणा - नाशिक ही बस वणी बाजुकडे भरधाव वेगाने येत असतांना बसने वणी - बाजुकडून बोरगांव कडे जाणाऱ्या दुताकीस उडविले यात विशाल नंदु शेवरे, वय २४, सायली विशाल शेवरे वय २०,

अमृता विशाल शेवरे वय ८ महिने रा. सारोळे खुर्द, ता. निफाड हे जागीच ठार झाले. तर बसमधील मजुंळा एकनाथ वाघमारे वय. २८ रा. हनुमंतपाडा ता. कळवण, देविदास तुळशीराम भोये वय ३०, भोरमाळ बुबळी, तारा रमेश कुभांर वय ३५, रमेश नाथा कुंभार वय ४९ रा. पचंवटी नाशिक, कृष्णा त्रंबक गांवडे वय २७ रा. उंटओहळ आंबाडा, ता. सुरगाणा हे जखमी झाले आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

accident
Solapur Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ५५ वर्षीय आरोपीला सक्तमजुरी

जखमींना वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सदर बसने पहिल्या दुचाकीस चिरडल्यानंतर पुढेच एका झाडाखाली दुचाकी उभी करुन झाडाच्या सावलीत थोड्या अंतरावर दोघे दुचाकीवरील व्यक्ती बसलेल्या असतांना याही दुचाकीस बसने उडविले दुचाकीचा चेंदांमेंदा केला, मात्र सुदैवाने नशीब बलव्वतर म्हणून हे दुचाकीस्वार बाल बाल बचावले.

अपघात केल्यानंतर बस चालकाचा वाहानावरील ताबा सुटून एका विद्युत खांबास कतरता कट मारुन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस एका शेतात जावून आंब्याच्या झाडास धक्का देवून थांबली. अपघातानंतर स्थानिकांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवित, जखमींना रुग्णवाहिकेस पाचारण करुन जखमींना वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.

accident
Nashik Crime News : चोरट्याकडून 12 मोबाईल हस्तगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.