नाशिक : केंद्र सरकारच्या नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत घरकुल योजना राबविण्यासाठी महापालिकेने २००७ मध्ये शहरात झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले.
त्यात १५९ झोपडपट्ट्या आढळल्या, परंतु मागील सोळा वर्षात जमिनींचे गगनाला भिडलेले भाव, वाढत्या इमारती, रोजगार व अन्य कारणांमुळे झोपडपट्ट्या वाढत असल्याची बाब निदर्शनास आली होती.
त्याअनुषंगाने राज्य शासनाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला झोपडपट्ट्यांतील झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यानंतर तब्बल सात महिन्यानंतर नगररचना विभागाकडे अतिक्रमण विभागाकडून प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
नगररचना, मिळकत, भूसंपादन या विभागांकडून बाह्य एजन्सीमार्फत सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहीत अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांनी दिली. (Types of Land Grabbing with Free Housing new survey of slums in city by nmc nashik)
घरकुल योजना राबविण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून २००७ मध्ये शहरात झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात १५९ झोपडपट्ट्या सर्वेक्षणात आढळल्या त्यातील ५५ झोपडपट्ट्या अधिकृत तर १०४ झोपड्या अनधिकृत असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली.
१०४ अनधिकृत झोपडपट्ट्यांपैकी खासगी जागेवर ८२, मनपाच्या जागेवर ६ तर, शासकीय जागांवर १६ झोपडपट्ट्या आहेत. १०४ अनधिकृत झोपडपट्ट्यांपैकी खासगी जागेवर ८२, महापालिकेच्या जागेवर सहा तर, शासकीय जागांवर १६ झोपडपट्ट्या आहेत.
घरकुल योजनेंतर्गत सात हजार झोपडीधारकांना घरकुले उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर झोपडपट्ट्यांची संख्या कमी होणे अपेक्षित होते. परंतु उलट झोपडपट्ट्या वाढल्या.
शहरात जागांचे भाव सातत्याने वाढतं असल्याने भूमाफियांकडून जमीन बळकाविणे, रोजगारासाठी शहरात आल्यानंतर तात्पुरता आसरा तसेच अन्य कारणांमुळे झोपडपट्ट्या वाढतं आहेत.
यासंदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी शहरातील अघोषित झोपडपट्ट्या नियमितीकरणाबाबत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्यानंतर झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना ऑगस्ट २०२३ मध्ये देण्यात आल्या.
परंतु महापालिकेच्या अतिक्रमण व झोपडपट्टी निर्मुलन विभागाकडे मनुष्यबळ व स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे नगररचना विभागाकडून सर्वेक्षण करून घेतले जाणार आहे. बाह्य यंत्रणेमार्फत जिओ टॅगिंग व सर्वेक्षण सुरू आहे. त्या यंत्रणेच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव तयार करून सादर केला जाणार आहे.
सद्यःस्थितीत झोपडपट्ट्यांची स्थिती
शहरातील एकूण झोपडपट्ट्या- १५९
घोषित - ५५
अघोषित - १०४
घोषित झोपड्या- २०,८८५
घोषित नागरिक- ९७,१२६
अघोषित झोपड्या- २०,५२२
अघोषित नागरिक- ९५,८३३
खासगी झोपडपट्ट्या- ११४
महापालिकेच्या जागेतील झोपडपट्ट्या- १५
शासकीय जागांवरील झोपडपट्ट्या- ३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.