नाशिक : त्रिसदस्यीय प्रभागरचना रद्द करून पुन्हा नव्याने चार सदस्यांच्या प्रभागांची घोषणा करण्यात आल्याने यापूर्वी बिघडलेली राजकीय गणिते नव्याने जुळण्यास प्रस्थापितांकडून सुरवात झाली आहे.
मागील वादविवाद, पक्षांतर यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर तडजोड आता अपरिहार्य ठरणार आहे. (U Turn of incumbent as soon as ward structure changes NMC Election Latest Marathi News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी करताना मागील पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. पक्षावर नाराज होऊन अनेकांनी पक्षांतर केले, तर चार सदस्यांच्या प्रभागात एकमेकांची भांडणे झाली.
त्यामुळे स्व:पक्षातच नाराजीची मोठी लाट निर्माण झाली. अनेकांवर मतदार नाराज झाले, तर काहींनी सुरक्षित प्रभाग तयार केले व शोधलेही. नवीन प्रभाग रचनेनुसार तयारी झाल्यानंतर जुन्या म्हणजे २०१७ च्या प्रमाणे निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता नव्या राजकीय गणिताची मांडणी सुरू झाली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र
२०१७ च्या निवडणुकीत प्रभात १२ मध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. नवीन प्रभाग रचनेत प्रभाग १६ व १७ मध्ये विभाजन झाल्याने काँग्रेस अडचणीत होती. आता जुन्या प्रभागानुसार पुन्हा काँग्रेसला आशा निर्माण झाल्या.
त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील व समीर कांबळे यांचा पॅनल भाजपला भिडेल. अशीच परिस्थिती जुन्या प्रभाग १४ संदर्भात राहील.
जुने नाशिकमध्ये वादाला मुरड
नवीन प्रभाग रचनेत जुने नाशिकमध्ये महाविकास आघाडी धोक्यात होती. आता शिवसेना वगळता प्रभाग १३ मध्ये काँग्रेसला आशा निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भांडणे उभे राहिलेल्या राष्ट्रवादीचे गजानन शेलार, काँग्रेसचे शाहू खैरे हे दोघे एकमेकांशी कसे जुळवून घेतात यावर महाविकास आघाडीचे भविष्य अवलंबून राहील.
त्यातही शिवसेनेकडून संजय चव्हाण, माजी महापौर विनायक पांडे व ॲड. यतीन वाघ या तिघांमध्ये तिकिटासाठी स्पर्धा होऊन वाद होण्याची शक्यता निर्माण आहे.
पुन्हा पाया पडणे आलेच
माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यावर मतदार नाराज असल्याने त्यांनी मुंबई नाक्यापासून तुटलेल्या चांडक सर्कलच्या नवीन प्रभाग १७ मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता पुन्हा जुन्या मतदारांकडे विनंती करावी लागणार आहे.
अशीच परिस्थिती भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या उपनेते सुनील बागूल यांच्या संदर्भात होणार आहे.
सेनेला सिडकोत शह
२०१७ नुसार शिवसेनेची सिडकोत ताकद आहे. परिणामी जुन्या रचनेमुळे शासन निर्णय सेनेच्या पथ्यावर पडला असला तरी भाजपकडून सेनेला शह देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना सिडकोमध्ये रोखून ठेवण्यासाठी व्यूहरचना आहे.
यांच्यासाठी फायदेशीर घोषणा
मनसेचे सलीम शेख व योगेश शेवरे, शिवसेनेचे संतोष गायकवाड, विशाल संगमनेर, प्रशांत दिवे, भाजपचे राकेश दोंदे, भगवान दोंदे, कमलेश बोडके, सतीश सोनवणे, काँग्रेसचे राहुल दिवे यांच्यातील काही जणांचे प्रभाग आरक्षणामुळे, तर काही जणांचे प्रभाग रचनेमुळे पत्ते कट होण्याच्या मार्गावर होते. शासन निर्णयामुळे मात्र आता तेदेखील सुरक्षित झाले.
जुन्यांना सोपे, नव्यांना अवघड
२०१७ प्रभाग रचनेत यांनी निवडणूक लढविली त्यांच्यासाठी शासन निर्णय फायदेशीर ठरला आहे. विद्यमान नगरसेवक विकासकामांच्या
माध्यमातून मतदारांपर्यंत पोचले आहे. पराभूत झालेल्या इच्छुकांचेदेखील यापूर्वी मतदारांसमोर पोचले. नवीन इच्छुकांसाठी मात्र मेहनतीचे ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.