Uday Samant | आयटी, ॲग्रो इंडस्‍ट्री पार्क उभारणार : उदय सामंत

Uday Samant
Uday Samantesakal
Updated on

नाशिक : सध्या अस्तित्‍वात असलेल्‍या उद्योगांना विस्‍तारीकरणाची संधी उपलब्‍ध करून देण्यासाठी एक खिडकी व्‍यवस्‍था उपलब्‍ध केली जाईल. नाशिकला शंभर एकरमध्ये आयटी पार्क उभारणी करण्यासह नामांकित कंपनीच्‍या डेटा सेंटर उभारणी केली जाईल. याशिवाय कृषी क्षेत्रातील क्षमता लक्षात घेता ॲग्रो इंडस्‍ट्री पार्क उभारले जाईल. पालकमंत्री दादा भुसे यांच्‍या अध्यक्षतेखाली समिती स्‍थापन करून लवकरच नाशिकच्‍या औद्योगिक क्षेत्राच्‍या विकासासाठी प्रयत्‍न करू, असे आश्‍वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. ४) दिले. (Uday Samant statement about IT Agro Industry Park set up nashik news)

अंबड येथील आयमा रिक्रिएशन सेंटर येथे झालेल्‍या औद्योगिक संघटनांच्‍या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, कार्यक्रमाचे मुख्य समन्‍वयक धनंजय बेळे, महापालिका आयुक्‍त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ, सल्‍लागार समिती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोपाळे, ललित बुब आदी उपस्‍थित होते.

श्री. सामंत म्‍हणाले, की यापूर्वीचे सरकार मंत्रालयात बैठक घेत होते. परंतु हे आपले सरकार असल्‍यामुळे आम्‍ही आपल्‍या दारात येऊन आपले प्रश्‍न समजून घेताना, ते सोडविण्यासाठी प्रयत्‍न करतो आहोत. नाशिकमध्ये आणखी उद्योग येण्याची क्षमता आहे.

बैठकीच्‍या सुरवातीस औद्योगिक संघटना प्रतिनिधी, उद्योजकांनी आपल्‍या मागण्या, समस्‍या मांडल्‍या. प्रास्‍ताविकात श्री. पांचाळ म्‍हणाले, की अन्‍य राज्‍यांमध्ये निर्यातीसाठी धोरण असून, उद्योजकांना अनुदान मिळते. याधर्तीवर महाराष्ट्रातही निर्यात धोरण आखले जावे. उद्योगांसाठी आकारले जाणारे वीजदर देशात सर्वाधिक असूनही गुणवत्तापूर्ण वीज मिळत नाही. याशिवाय मागणीच्‍या तुलनेत पुरवठा होत नाही. मलनिस्सारण केंद्रासह अन्‍य पायाभूत सुविधांचा विकास करण्याची मागणी त्‍यांनी केली.

Uday Samant
Nashik Crime News : कर्डेल खुनाचा सख्खा पुतण्याच Master Mind!; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

घरपट्टी व्यावसायिक नको

श्री. बेळे म्‍हणाले, उद्योग विभाग व महापालिका असा दोन्‍ही आस्‍थापनांकडून फायर सेस आकारला जातो आहे. २०१८ पासून उद्योग या प्रवर्गातील घरपट्टी बंद करत थेट व्‍यावसायिक दरांनी मालमत्ता कर आकारला जातो आहे. तब्‍बल अकरा पटींनी यामध्ये वाढ झालेली असून, ही जाचक वाढ कमी करावी. सिन्नरच्‍या इंडिया बुल्‍सकरिता अधिग्रहीत जमीन अन्‍य उद्योगांना उपलब्‍ध करून द्यावी, अशा विविध मागण्या मांडल्‍या.

नाशिकमध्ये रिक्रिएशन सेंटर व्‍हावे यांसह इलेक्‍ट्रिकल हबसाठी प्रयत्‍न होण्याची गरज महाराष्ट्र चेंबर्सतर्फे सुधाकर देशमुख यांनी व्‍यक्‍त केली. ‘नाईस’तर्फे रमेश वैश्‍य म्‍हणाले, रिक्रिएशनच्‍या जागेसाठी अत्‍यल्‍प दर आकारले जात असताना, नूतनीकरणावेळी त्‍यात भरमसाट वाढ केलेली असून, ती मागे घ्यावी. निवेकतर्फे संदीप गोयल यांनीही ही वाढ मागे घेण्याची मागणी केली.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Uday Samant
Nashik Crime News : घरफोड्या 2; गुन्हा मात्र एकच! : पोलिसांची अजब शक्कल

वाइन पॉलिसीमध्ये सुधारणा व्हावी

वाइन उत्‍पादकांतर्फे भूमिका मांडताना जगदीश होळकर म्‍हणाले, की नाशिकमधील कृषिप्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी. विविध फळांपासून वाइन उत्‍पादन करण्याबाबत राज्‍याच्‍या वाइन पॉलिसीमध्ये सुधारणा व्‍हाव्यात. वॅटशी निगडित थकीत परताव्‍याचा प्रश्‍न सुटावा.

‘स्टाइस’तर्फे श्री. आवारे म्‍हणाले, की सिन्नर परिसरातील औद्योगिक वसाहतींतील रस्‍ते व पायाभूत सुविधा विकसित व्‍हाव्‍यात, सिन्नर-शिर्डी रस्‍त्‍याचे रुंदीकरण व्‍हावे. किरण भंडारी म्‍हणाले, की मुसळगाव-माळेगाव औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्‍ता विकसित व्‍हावा. ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे राजेंद्र फड म्‍हणाले, शहराच्‍या चारही दिशांना प्रवेशाच्‍या ठिकाणी ट्रक टर्मिनल्‍स व्‍हावे. यामुळे वाहतूक कोंडी व वाढते अपघात रोखणे शक्‍य होईल.

आमदार हिरे म्‍हणाल्‍या, की औद्योगिक क्षेत्राशी निगडित प्रश्‍न जलद गतीने सोडविण्यासाठी शासनस्‍तरावर प्रयत्‍न व्हावेत. वीजदराबाबत पाठपुरावा सुरू असून, रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍ती, ड्रेनेजसह अन्‍य प्रश्‍न सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणार आहे.

खासदार गोडसे म्‍हणाले, की २५ ते ३० टक्‍के बंद पडलेल्‍या प्रकल्‍पांबाबत धोरणात्‍मक निर्णय घेताना औद्योगिक विकासासाठी प्रयत्‍न व्‍हावेत. दिल्‍ली-मुंबई इंडस्‍ट्री कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश होण्याची मागणी त्‍यांनी केली.

Uday Samant
Nashik News : चाकरमान्यांसाठी नववर्ष ठरणार पर्वणी; नववर्षात 125 सुट्ट्या!

अंबडमध्ये स्‍वतंत्र पोलिस ठाणे : भुसे

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्‍वतंत्र पोलिस ठाण्याबाबत यापूर्वीच प्रस्‍ताव शासनस्‍तरावर प्रलंबित आहे. मान्‍यतेसंदर्भात तांत्रिक त्रुटींची पूर्तता केलेली आहे. लवकरच अंबडसाठी स्‍वतंत्र पोलिस ठाणे उभारले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री भुसे यांनी केली. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिस दलातर्फे सध्यापुरता अतिरिक्‍त कर्मचारी नियुक्‍तीच्‍या सूचना देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सामंत यांच्या काही घोषणा

* उद्योजकांच्‍या प्रलंबित मागण्या, प्रश्‍न सोडविण्यासाठी बुधवारी (ता. ७) पालकमंत्री भुसेंच्‍या अध्यक्षतेखाली घेणार बैठक.

* फायर सेससाठी लवकरच दुहेरीऐवजी एकच कर आकारणार

* मालमत्ता करासंदर्भात महापालिका आयुक्‍तांना पाठविणार पत्र

* उद्योग प्रवर्गातून मालमत्ता कर आकारणीसह दरांच्‍या फेररचनेबाबत सुचविणार

* ट्रक टर्मिनल्‍सचा प्रश्‍न येत्‍या पंधरा दिवसांत सोडविणार

* अमृत-२ च्‍या माध्यमातून ड्रेनेजसंदर्भात प्रश्‍न सोडवू

* नाशिकमध्ये उभारणार आयटी पार्क, ॲग्री इंडस्‍ट्री पार्क

* नामांकित कंपनीच्या डेटा सेंटरची करणार उभारणी

* लघुउद्योगांना देणार रेड कार्पेट, धोरण ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करणार

Uday Samant
Nandurbar Crime News : फरारी 16 गुन्ह्यांतील आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक; 6 घरफोड्यांचे गुन्हे उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.