Uddhav Thackeray Shivsena: नीलेश साळुंखे, सुनील जाधव, मसूद जिलानी यांची निवड

shivsena uddhav balasaheb thackeray
shivsena uddhav balasaheb thackeray esakal
Updated on

Nashik News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तेच्या राजकारणात मुसंडी मारण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे संघटनात्मक बांधणीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

येत्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत सूक्ष्म पातळीवर काम करण्याच्या अनुषंगाने शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.

सूक्ष्म नियोजनात बूथ एजंट मतदारयादी प्रमुख व बूथप्रमुखांचीदेखील लवकरच घोषणा केली जाणार असल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena started strong preparations for organizational construction in order to get into politics of power nashik)

एकूण ५ हजार ३७० नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यापूर्वी पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नीलेश साळुंखे, मध्य विधानसभा मतदारसंघासाठी सुनील जाधव व पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी मसूद जिलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७९ बूथ आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात ३१७, मध्य विधानसभा मतदारसंघात २९५, तर देवळाली विधानसभा मतदारसंघांत ८३ बूथ आहे. बूथप्रमुखांची नियुक्ती करताना मतदारयादी प्रमुखांचीदेखील नियुक्ती लवकर जाहीर केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

shivsena uddhav balasaheb thackeray
Nashik News: निवृत्तांच्या ज्ञानदानाबाबत फेरनिर्णय घ्यावा; शिक्षक संघटनाचे मंत्री दीपक केसरकर यांना साकडे

साडेतीन विधानसभा मतदारसंघांमध्ये १०७४ मतदारयादी प्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. एका बुथवर दोन, असे २१४८ बूथ एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. येत्या काही दिवसात एकूण ५ हजार ३७० नियुक्त केल्या जाणार आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटात काही लोक सहभागी झाल्याने त्यांच्या जागी नवीन नियुक्त केल्या जात आहे. यामुळे नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाल्याचा दावा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

shivsena uddhav balasaheb thackeray
‍Nashik News: दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप; येथे करावा अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()