Nashik Political: उद्धव ठाकरेंची भाजपवर कुरघोडी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिर महाआरतीचे निमंत्रण

अयोध्येत येत्या सोमवारी (ता. २२) रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने वाद सुरू असताना ठाकरे यांनी भाजपवर कुरघोडी केली आहे
Uddhav, Draupadi Murmu & Pm Modi
Uddhav, Draupadi Murmu & Pm Modiesakal
Updated on

नाशिक : अयोध्येत येत्या सोमवारी (ता. २२) रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने वाद सुरू असताना ठाकरे यांनी भाजपवर कुरघोडी केली आहे.

नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात ते स्वतः महाआरती करणार असून, आरतीसाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे २२ जानेवारीला नाशिकमध्ये महाआरतीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचा जन्म झाला असला, तरी नाशिक ही कर्मभूमी आहे. येथे श्रीरामाने १४ वर्षे वनवास भोगला. त्यांना येथील आदिवासींनी मदत केली, याचाही संदर्भ पत्रात दिला आहे.(Uddhav Thackeray attack on BJP Invitation to President Draupadi Murmu for Kalaram Mandir Maha Aarti Nashik Political)

Uddhav, Draupadi Murmu & Pm Modi
Nashik Political: हिरे-भुसे वादाचा दुसरा अंक सुरू! हिरे यांच्या संस्थेतील कर्मचारी, सभासद कर्ज चौकशीचे सहकारकडून आदेश

सोमनाथ येथील मंदिराचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी उद्‍घाटन केले होते. आपणही नाशिकमधील काळाराम मंदिराला भेट द्यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याने विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात आली होती.

राममंदिराच्या उद्‍घाटनानिमित्त राष्ट्रपतींना निमंत्रण देऊन शिवसेनेने भाजपला डिवचल्याचे बोलले जात आहे.

Uddhav, Draupadi Murmu & Pm Modi
Mumbai Politics: मुंबई शिक्षक आमदार निवडणुकीसाठी तानाजी कांबळे यांची उमेदवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.