Uddhav Thackeray: "शिवसेना संपविण्याचा कट २०१४ मध्येच..."; नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बाळासाहेबांचे निधन झाल्याने आता शिवसेनेचा काय उपयोग? असा विचार करत भाजपने २०१४ मध्येच शिवसेना संपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आमचे ६३ आमदार निवडून आल्याने भाजपवाले घाबरले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

Uddhav Thackeray News In Marathi

नाशिक: ‘‘शिवसेनेने कठीण काळात भाजपला मदत केली. परंतु, तेच शिवसेना संपवायला निघाले. बाळासाहेबांचे निधन झाल्याने आता शिवसेनेचा काय उपयोग? असा विचार करत २०१४ मध्येच शिवसेना संपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आमचे ६३ आमदार निवडून आल्याने भाजपवाले घाबरले होते,’’ असे प्रतिपादन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘ गारपीट, अवकाळीत मोदींना महाराष्ट्र आठवला नाही. लोकसभेच्या ४८ जागा असलेला महाराष्ट्र त्यांना आठवू लागल्याने त्यांच्या चकरा वाढल्या आहेत. अवकाळी संकटात गुजरातला १००० कोटी रुपये दिले परंतु महाराष्ट्राला ठेंगा दाखविला. देशासाठी ‘मन की बात’ गुजरातसाठी ‘धन की बात’ असे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्र ओरबडण्याचे काम होत आहे. मिंधे सरकार मात्र शेपूट हलवत बसले आहे. आमच्या हक्काचे वैभव आम्ही ओरबडू देणार नाही.’’

‘‘ रामाच्या नावाने मोदी मते मागत आहेत. आपण सांगू तेच विधान, भाजपचे निशाण व मोदी हेच प्रधान अशी वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सर्वाधिक धोका महाराष्ट्राला आहे. परंतु आपल्याकडे लोक सांगतील तोच प्रधान असेल. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या घटनेनुसार व लोकांनी मतपेटीतून निवडून दिलेला प्रधान अशी व्यवस्था आणण्यासाठी गद्दारांना महाराष्ट्र व देशातून हाकलून द्या,’’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray
कोण आहेत कर्पूरी ठाकूर? ज्यांना मिळला मरणोत्तर भारतरत्न; जाणून घ्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची संपूर्ण कहाणी

ती वेळ आता आली आहे-

‘‘ धर्मावर अधर्माचे संकट आल्यानंतर देवी-देवता अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्तीचा नाश करतात. ती वेळ आता आली आहे. त्याला कारण म्हणजे आता निवडणुका आल्याने प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागितली जात आहेत. राम मंदिर शिवसेनेच्या अस्मितेचा विषय आहे. राम मंदिराला विरोध नाही. परंतु राम मंदिर उभारणीत शिवसेनेचे योगदान विचारले जाते हे वाईट आहे. शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही,’’ असे ठाकरे यांनी नमूद केले.

त्यांच्यावर कारवाई करणार का?-

‘‘ बाबरी पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हते. शिवसेनाप्रमुखांनी पुढाकार घेतला. हे आमचे योगदान आहे. भाजपने घोटाळेबाज मंत्र्यांना पक्षात घेतले. त्यांनी शंकराचार्यांचा हिंदू धर्माचा संबंध काय? असे वक्तव्य केले. भाजपवाले सनातन धर्म मानत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार का?’’ असा सवाल ठाकरे यांनी केला. राम मंदिर उद्‍घाटनाच्या
कार्यक्रमात शंकराचार्यांना स्थान नाही परंतु नट-नट्यांना अग्रक्रमाचे स्थान दिले गेले, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Manoj Jarange : जरांगेंचा मोर्चा पुण्यात धडकणार! विद्यापीठ चौकातून होणार मार्गस्थ, 'या' मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.