Uddhav Thackeray News : नाशिकमधील गद्दारांना धडा शिकवा! उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Uddhav Thackeray News : खासदार हेमंत गोडसे यांच्यासह नाशिकमध्ये मिंधे सेनेत ज्यांनी प्रवेश केला त्यांना शिवसेनेने सर्व काही दिले होते. असे असतानाही त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली.

त्यामुळे गोडसे यांच्यासह गद्दारांना कोणत्याही स्थितीत धूळ चारून नाशिक लोकसभा जिंका असे आवाहन शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. (Uddhav Thackeray statement about lok sabha election winning nashik news)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. ठाकरे यांच्याकडून लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकायांच्या बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मातोश्री येथे गुरुवारी बैठक घेतली, त्यावेळी ठाकरे यांनी लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

श्री. ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरायचे आहे. त्यामुळे काही जागांवर तडजोड करावी लागेल. त्याअनुशंगाने मानसिक तयारी ठेवावी लागेल. पक्षात फूट पडल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे ? याचा आढावा घेतला.

नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागावे, शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी बूथ प्रमुख त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Uddhav Thackeray
Sharad Pawar यांना खिंडीत पकडलं?, Congress आणि Shivsena यांचा प्लॅन ‘बी’ ठरला? |Uddhav Thackeray

नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकद लाऊन उमेदवार निवडून आणावा, काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्याची तयारी ठेवा. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे. उमेदवार निवडून आणायचाच असा निर्धार प्रत्येकाने करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

संपर्कनेते संजय राऊत, उपनेते सुनील बागूल, अद्वय हिरे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, जयंत दिंडे, गणेश धात्रक यांच्यासह तालुकानिहाय संपर्क प्रमुख उपस्थित होते.

४८ मतदारसंघांचा आढावा

२०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे. त्या अनुशंगाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर राज्यातील दोन 'पाटील'; नगर अन् जळगावचा घेतला आढावा, दिला हा कानमंत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.