Uddhav Thackeray News : हो, शिवसेना अन्‌ शिवसैनिक माझीच वडिलोपार्जित संपत्ती : उद्धव ठाकरे

त्र्यंबक रोडवरील हॉटेल ड्रेमॉक्रसी येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.
Uddhav Thackeray statement at convention jahir sabha
Uddhav Thackeray statement at convention jahir sabhaesakal
Updated on

नाशिक : हिंदुत्वाची ठिणगी मनामनात पेटविणाऱ्या माझ्या बापाची शिवसेना आहे.

शिवसेना आणि शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती असल्याचे विरोधकांना ठणकावून सांगत, आमची शिवसेना पळविणाऱ्यांचा राजकीय वध तमाम शिवसैनिक करतील, असा निर्धारच या मेळाव्यातून करणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. (Uddhav Thackeray statement at convention jahir sabha Shiv Sena and Shiv Sainik my ancestral property nashik political news)

त्र्यंबक रोडवरील हॉटेल ड्रेमॉक्रसी येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर युवा नेते आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, भास्कर जाधव, अजय चौधरी, सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.

प्रारंभी, दीपप्रज्वलनानंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर ठाकरे यांनी राज्यव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले, कालच्या इव्हेंटमध्ये रामाचे मुखवटे घालून फिरणाऱ्या रावणाचे मुखवटे फाडायचे आहेत.

मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आम्हाला अजिबात चालणार नाही. या महाराष्ट्रातील मातीच्या तेजामुळेच अयोध्येतील राममंदिर उभे राहिले आहे. नोव्हेंबर २०१८ च्या दसरा मेळाव्यात अयोध्येला जाण्याचे जाहीर केले आणि जाताना महाराजांच्या शिवनेरीची मातीचा कलश आम्ही अयोध्येला नेला होतो.

त्या वेळी मोदी जगभर फिरत होते. त्यांना प्रभू रामाचे स्मरणही नव्हते. पंतप्रधान झाल्यानंतर ते कधीही अयोध्येला गेले नाहीत. या महाराष्ट्रावर चालून आलेल्यांना महाराष्ट्राच्या मातीतच गाडले आहे. औरंगजेबही याच मातीत गाडला गेला. आता वेळ आली आहे महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांना पुन्हा महाराष्ट्रात गाडायची, असे आव्हानही दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला हिंदुत्व शिकविणाऱ्यांनी आधी आपले स्वातंत्र्यातील योगदान तपासावे. भगव्यामध्ये भेद करणारे ही नालायक जमात आहे.

जय श्रीरामाचा नारा देता, त्या रामाचा एकतरी गुण तुमच्यात आहे का, असा सवाल करीत, राम कोणा एकाची मालमत्ता नाही. जर तसे करणार असाल तर आम्हीही भाजपमुक्त प्रभू श्रीराम करण्यासाठी सज्ज आहोत. राम एकवचनी होता. वचन मोडणारे रामभक्त कसे काय, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray statement at convention jahir sabha
Uddhav Thackeray Nashik Sabha: राक्षसांचा वध करण्याची वेळ आली, उद्धव ठाकरे कडाडले; नाशिकच्या सभेतून भाजपवर घणाघात

तुम्हालाही तुरुंगामध्ये टाकू

कोरोनाकाळात केलेल्या कामांमध्ये घोटाळे नसताना ते काढून त्रास देत आहात. झाला ना कालचा इव्हेंट, अब काम की बातें करे. सांगा, गेल्या दहा वर्षांत काय केले.

पीएम केअरचा हिशेब द्या. आमचा प्रत्येक शिवसैनिक तुमच्याशिवाय वाकणार नाही, झुकणार नाही. पण, लक्षात ठेवा जे तुम्ही करताय, तेच आम्हीही करू. तुम्हालाही तुरुंगामध्ये टाकू.

...तरच देश वाचेल

महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल. त्यासाठी यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडायचा आहे. ‘होऊ द्या चर्चा’ ही मोहीम शिवसैनिकांनी पुन्हा सुरू करायची आहे. शिवनेरीचे माती कलश प्रत्येक जिल्ह्यात पोचून अवघा महाराष्ट्र मिंधे सरकारविरोधात पेटवायचा आहे.

महाराजांचे तेजाचे कण या मातीत आहे. त्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन लढायचे आहे. आपल्या भारतमातेला पुन्हा स्वतंत्र करण्याचा निर्धार प्रत्येक शिवसैनिकाने करायचा आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले...

- हिंदुत्वासाठी ज्यांना सोबत घेतले त्यांच्याशी ३० वर्षे राहिलो तेव्हा भाजपमय झालो नाहीत तर काँग्रेसमय कसे होणार?

- तुमचे स्वातंत्र्यातील योगदान काय, त्यांना आयते स्वातंत्र्य मिळाले
- शिवसैनिक नसता तर आज राममंदिर उभे राहिले असते का?
- महिलांवर भरदिवसा अत्याचार होतात, ते रामराज्य कसे?
- जनता न्यायालयात त्यांचा निकाल लागेल

Uddhav Thackeray statement at convention jahir sabha
Uddhav Thackeray: "शिवसेना संपविण्याचा कट २०१४ मध्येच..."; नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()