Nashik News : अभोण्याला उमाबाई दाभाडेंच्या कर्तृत्वाचे ‘कोंदण’

Umabai Khanderao Dabhade oil painting
Umabai Khanderao Dabhade oil paintingesakal
Updated on

अभोणा : पराक्रमाची पराकाष्टा करणारी इतिहासातील अनेक पात्रे अज्ञात असली तरी त्या इतिहासाच्या पैलूंची चमक कधी कमी होत नसते. पेशवाईतील इतिहासाला पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी पराक्रमाची झालर चढवली अन् अभोणा गावच्या इतिहासाला शौर्याचे अनोखे ‘कोंदण’ही मिळाले.

पेशवाईच्या काळात महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी गाजवलेल्या पराक्रमाने त्यांच्या माहेराला म्हणजे अभोणा गावाला एक ओळख मिळाली आहे. आज (ता. २८) त्यांच्या स्मृतीदिनी त्यांची आठवण आली नाही तरच नवल. (Umabai Khanderao Dabhade woman commander in chief during Peshwa period History Related Abhona Villege Nashik News)

Umabai Khanderao Dabhade oil painting
Nashik News : महिलांनी शेतमालाच्या Marketingसह प्रक्रिया उद्योग व्यवस्थापन घ्यावे जाणून
An intact strong gate of a defunct fortress
An intact strong gate of a defunct fortressesakal

महाराष्ट्रातील सर्वात जास्त किल्ले असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात लहान- मोठ्या गढी पहायला मिळतात. यातील काही गढी काळाच्या ओघात नष्ट झाल्या असून, काही गढी आपल्या अंगावर उरलेसुरले अवशेष सांभाळत काळाशी झुंजत आहेत. बागलाण प्रांताची अभोणा येथे ठोके राणीची गढी म्हणून ओळखली जाणारी एक गढी होती.

गिरणा नदीकाठावर संपूर्ण तटबंदी व बुरुज असलेली गढी इतिहासाची साक्ष देत असे. मात्र, कालांतराने तटबंदी व गोलाकार बुरुज नामशेष झालेत. या गढीचा भक्कम दरवाजा मात्र अजूनही सुस्थितीत आहे. सर्व नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड देत गढीचा दरवाजा व त्याचे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे.

या दरवाजाच्या कमानीची उंची साधारण २५ फुट आहे. इतिहासाची पाने चाळली असता उमाबाईंचे शौर्य दिसून येते. मराठ्यांच्या इतिहासात कर्तृत्ववान, लढवय्या महिला म्हणून उमाबाई दाभाडे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Umabai Khanderao Dabhade oil painting
Motivational Story : रत्नाताईंची एसटी बस पोहोचली महाराष्ट्रात

मराठा दाभाडे कुळांचे प्रमुख सदस्य होते. त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी त्यांना सेनापती असे नाव दिले आणि गुजरातमध्ये अनेक प्रदेशांवर नियंत्रण ठेवले. त्यांच्या माहेरी सरदारकीचे वातावरण असल्याने लढवय्या बाणा त्यांच्यात होताच. शस्त्र चालविण्यात आणि घोडस्वारीत त्या अव्वल होत्या. यशवंतरावांना सरसेनापतिपद, तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र, ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दुःख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या. इ. स. १७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली.
रणांगणात अलौकिक शौर्य
मोगलांच्या जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू महाराज खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ पायात सोन्याचे तोडे घातले.
गडावर पायऱ्या बांधल्याची नोंद
उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. इ. स. १७१० मध्ये उमाबाई दाभाडे यांनी सप्तश्रृंगी देवीच्या गडावर ४७० पायऱ्या बांधल्याची नोंद इतिहासात आजही सापडते.

Umabai Khanderao Dabhade oil painting
Nashik News : मनातल्या विचारांवर आधारलेले चेटूकवारं; राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.