उंबरमाळ पाडावासीयांना हवंय कायमस्वरूपी स्थलांतर; दरड कोसळण्याचा धोका

landslide & umbermale pada residents
landslide & umbermale pada residentsesakal
Updated on

नाशिक : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बोरपाडा-घनशेत (ता. पेठ) मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन (Landslide) झालंय. रस्ता आणि डोंगराला भेगा पडल्या असून, दरड कोसळल्या आहेत. मार्गावरील आदिवासींना धोकादायक प्रवास करावा लागतोय.

भूस्खलनामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या उंबरमाळला धोका निर्माण झाला आहे. दरड कोसळल्यास पाडा नामशेष होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गाव रिकामे केले असून, खरपडीपाड्यावरील आश्रमशाळेत स्थलांतर करण्यात आले.

दोनशे वस्तीच्या या पाड्यावरील रहिवाशांना कायमस्वरूपी स्थलांतर हवंय. त्यासंबंधीचा ग्राउंड रिपोर्ट. (Umbarmale pada residents want permanent migration Risk of landslide Nashik latest marathi news)

गावात जाण्यासाठी रस्ता झालेला नाही. रुग्णांना डोलीमधून दवाखान्यात न्यावे लागते. त्यामुळे पाड्याचे स्थलांतर करणे हा पर्याय आहे. रस्त्यावर गेल्या वर्षी दरड कोसळली; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा धोका तयार झाला आहे. भूस्खलनामुळे आठ ते दहा गावांना जोडणारा रस्ता बंद झाला आहे. दरड कोसळताच गावांशी संपर्क तुटणार आहे.

landslide & umbermale pada residents
कांदाभावात किलोला 50 पैसे ते रुपयाने घसरण

भाताच्या लागवडीचा प्रश्‍न गंभीर

आदिवासी भागात भाताच्या लागवडीला वेग आला आहे. मात्र, शेतात जाण्यासाठीचा रस्ता बंद झाल्याने भाताच्या लागवडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. उंबरमाळ पाड्यावरील रहिवाशांचे स्थलांतर केल्याने गावातील जनावरांना चारा-पाणी कोण देणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. घराकडे जाऊ देत नसल्याने भाताची लागवड केली नाही, तर वर्षभर काय खायाचे, या प्रश्‍नाने आदिवासी कुटुंब त्रस्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डॉक्टर वसतिगृहात पोचले आहेत. आदिवासींची मोफत शुश्रूषा आणि भोजनाची व्यवस्था केली आहे.

आदिवासी बांधव काय म्हणताहेत?

"आमच्या पाड्यावर दरड कोसळणार म्हणून चार दिवसांपासून आम्हाला इथे आणले आहे. आमच्या घरी कुणी नाही. भाताची लागवड सुरू होती. आता भात लावला नाही, तर वर्षभर काय खायचे, याचा विचार व्हावा." -सोनीबाई राठड, ग्रामस्थ

"आश्रमशाळेत आम्ही चार दिवसांपासून आहोत. गावात आम्हाला जाऊ दिले जात नाही. गावात दीडशे ते दोनशे जनावरे आहेत. त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी."-चंदर गाडर, ग्रामस्थ

"रस्ता वाहतुकीसाठी घातक झाला आहे. गावातील लोक त्याच्यावरून गाड्या घेऊन जात आहेत. दरड केव्हाही कोसळू शकते. मोठ्या अपघाताची शक्यता आहे. प्रशासनाने ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे." -काशीनाथ चौधरी, माजी सरपंच, पिंपळवटी

"आम्हाला दर वर्षीचा त्रास आहे. यंदा मोठी दरड कोसळल्याने किती दिवस राहावे लागेल, हे सांगतात येत नाही. गावाकडे जाण्यासाठी आम्हाला आजपर्यंत रस्ता मिळालेला नाही. गावात वीज चार दिवसांहून अधिक काळ गायब असते. रुग्णांना डोलीतून दवाखान्यात न्यावे लागते."

-शेवंता गाडर, ग्रामस्थ

"वसतिगृहात प्रशासनाने निवास, भोजनाची आणि वैद्यकीय व्यवस्था केली आहे. पण मूळ प्रश्न रस्त्याचा आहे. प्रशासन दुर्लक्ष करते म्हणून समस्यांना नेहमी ग्रामस्थांना सामोरे जावे लागते."

-रामदास भोये, खरपडी

landslide & umbermale pada residents
Nashik : तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षणाच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.