Nashik News : आयमा स्वीकृत उपाध्यक्षपदी उमेश कोठावदे; विविध समित्यांच्या चेअरमनच्या नावांचीही घोषणा

‘आयमा’च्या विविध समित्यांचे चेअरमन आणि विशेष आमंत्रित सदस्यांची नावेही या वेळी जाहीर करण्यात आली.
Umesh Kothavade
Umesh Kothavadeesakal
Updated on

सातपूर : अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या नूतन कार्यकारिणीची बैठक नवनिर्वाचित अध्यक्ष ललित बूब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन त्यात ‘आयमा’च्या स्वीकृत उपाध्यक्षपदी उमेश कोठावदे यांच्या नावाची घोषणा बूब यांनी केली. या वेळी कोठावदेंवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

तसेच, ‘आयमा’च्या विविध समित्यांचे चेअरमन आणि विशेष आमंत्रित सदस्यांची नावेही या वेळी जाहीर करण्यात आली. (Umesh Kothavade accepted AIMA Vice President announcement of names of chairman of various committees Nashik News)

स्वीकृत उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले ज्येष्ठ उद्योजक उमेश कोठावदे यांनी ‘आयमा’च्या कार्यकारिणीत सहा वर्षे काम केले आहे. आयमा बुलेटिन, मूलभूत सेवा, तसेच बांधकाम आदी समित्यांच्या चेअरमनपदाची धुराही त्यांनी सांभाळली.

त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच या वेळी त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविताना आनंद असल्याचे बूब यांनी त्यांचा सत्कार करताना सांगितले; तर पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे उपाध्यक्ष कोठावदे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले.

नूतन स्वीकृत उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांचे चेअरमन आणि सर्व विशेष निमंत्रित सदस्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार झाला. कार्यक्रमास बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘आयमा’चे आयपीपी निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष वरूण तलवार, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची ‘आयमा’ची खासियत असल्याचे सांगून बूब आणि त्यांची टीम ‘आयमा’च्या विकासाला निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास ‘निमा’चे अध्यक्ष बेळे यांनी व्यक्त केला.

सप्तशृंगी एन्टरप्रायजेसचे शरद दातीर यांचा विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारिणीत समावेश करून विरोधकांचाही आम्ही सन्मान करतो, हे कृतीने सिद्ध करून दाखविले. ‘आयमा’चे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस प्रमोद वाघ, खजिनदार गोविंद झा, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे आणि कार्यकारिणी सदस्यही या वेळी उपस्थित होते.

Umesh Kothavade
Devendra Fadnavis : सिंहस्थ आराखडा तातडीने सादर करा : उपमुख्यमंत्री फडणवीस

‘आयमा’च्या विविध समित्यांचे चेअरमन पुढीलप्रमाणे :

सेमिनार समिती- देवेंद्र विभुते, मेंबरशिप समिती- जयदीप अलिमचंदानी, औद्योगिक तक्रार समिती- दिलीप वाघ, आयमा रिक्रिएशन ॲण्ड आयमा हाउस समिती- हेमंत खोंड, पॉवर समिती- रवींद्र झोपे, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन समिती- विराज गडकरी, फंड रेजिंग समिती- रवी श्‍यामदासानी व को. चेअरमन- विनोद कुंभार, वुमेन इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट समिती- श्वेता चांडक, स्पोर्टस समिती- जयंत पगार, को-चेअरमन- अभिषेक व्यास, आयमा डिजिटायजेशन समिती- राहुल गांगुर्डे, बुलेटिन समिती- अविनाश बोडके, वाहतूक प्लॅनिंग समिती- विनोद कुंभार, मूलभूत सेवा व सेक्टर वॉक समिती- कुंदन डरंगे, हेल्थ ॲण्ड इंडस्ट्रियल सेफ्टी- करणसिंग पाटील, एव्हिएशन ॲण्ड इंडस्ट्रीयल कोलॅबरेशन समिती- मनीष रावल, एक्स्पोर्ट एन्हान्समेंट समिती- रवींद्र महादेवकर, को-चेअरमन- जगदीश पाटील, फायनान्स ॲण्ड सबसिडीज- सुमीत बजाज, वेबसाईट ॲण्ड अपॅ डेव्हलपमेंट समिती- चेअरमन अविनाश मराठे, को-चेअरमन- मयूर मुंद्रा, एन्व्हॉर्नमेंट इन्हान्समेंट समिती- श्रीलाल पांडे, एच. आर. समिती- धीरज वडनेरे, कल्चरल समिती-जितेंद्र आहेर, को-चेअरमन- अजय यादव, सस्टेनेबिलिटी ॲण्ड क्लायमेन्ट चेंज- वेदांत राठी आणि आयमा यूथ सेल- अभिषेक व्यास.

विशेष आमंत्रित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :

योगेश्वर इंजिनिअरिंगचे अलोक कनानी, डेल्टा फिनोकेमचे मनोज मुळे, भगवती इंडस्ट्रीजचे- सुमीत तिवारी, जेआरडी आयर्न ॲण्ड स्टीलचे रामचंद्र जोशी, नाशिक मेटल डस्टचे मयूर मुंद्रा, आरएमएस इंडस्ट्रीजचे रणजित सानप, प्रतीक एन्टरप्रायजेसचे प्रतीक पगारे, सिन्नरसाठी शिवम टिप्स इंडस्ट्रीजचे सूरज आव्हाड, दिलीप इंडस्ट्रीजचे नागेश पिंगळे.

Umesh Kothavade
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.