Nashik : तापमानात वाढीमुळे ग्रामीण भागात भर दुपारी अघोषित संचारबंदी

Curfew in Village
Curfew in Villageesakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : वैशाख वणव्याचे ऊन तापू लागले. त्यामुळे तापमान वाढ (Rising temperature) होत असल्याने ग्रामीण भागात (Rural Areas) तर भर दुपारी अघोषित संचारबंदीचे चित्र गावोगावी पाहण्यास मिळत आहे. वाढते तापमान हे पशु- पक्ष्यांसह माणसांनाही नकोसे करून टाकत असून, भर दुपारी तर झाडांच्या सावलीशिवाय पर्याय नाही. (Unannounced curfew in rural areas due to rise in temperature Nashik News)

Curfew in Village
Nashik : सिटीलिंकतर्फे विद्यार्थ्यांसाठी बसफेरी

ग्रामीण भागात अंतिम टप्प्यात कांदा काढणी सुरू असून, मंजूर वर्ग तर वाढत्या उन्हामुळे सकाळी लवकर कामास प्रारंभ करतात व दुपारी उन्हात विश्रांती घेतात. ग्रामीण भागातील गजबजणारे रस्ते या वाढत्या उन्हामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत ओस पडत आहेत. शेतमळ्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बांधावर लिंबुचे झाड असल्याने वाढत्या उन्हामुळे लिंबू सरबतबरोबर गरीबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठातील व घागरीचे पाणी फायदेशीर ठरत आहे. रानात गुरे, मेंढ्या, गाईंना भर दुपारी विश्रांतीसाठी झाडाच्या सावलीचा आश्रय घेत आहेत.

Curfew in Village
धावपळीच्या युगातही आजही पारंपारिकेतला महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.