Nashik Water Shortage : पंचवटीच्या अनेक भागात अघोषित पाणीकपात; नागरिक त्रस्त

Water scarcity
Water scarcityesakal
Updated on

Nashik News : धरणातील उपयुक्त पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने शनिवार (ता. २९)पासून एक दिवस पाणी कपातीची घोषणा केली आहे. ( Unannounced water cuts in many areas of Panchvati from last week nashik news )

परंतु, पंचवटी गावठाणसह परिसरातील म्हसरूळ, आडगाव आणि विविध उपनगरे, नववसाहतींत मागील आठवड्यापासूनच पाणी कपात होऊ लागल्याने नागरिक त्रस्त आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ‘नॉट रिचेबल’चा अनुभव येत असल्याचे अनेकांनी सांगितले.

पंचवटीतील गावठाण भाग हा उंचसखल असल्याने काही ठिकाणी मुबलक, तर काही ठिकाणी नळाला थेंबथेब पाणी अशी परिस्थिती आहे. म्हसरूळ परिसरातील स्नेहनगर, आदर्श सोसायटी, केतकी सोसायटी, एकतानगर भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.

किशोर सूर्यंवंशी मार्गावरील अनेक सोसायट्यांत भल्या पहाटे पाणी येते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. आडगाव गावठाण भागासह शिवारातील शरयू पार्क, कोणार्कनगर, महालक्ष्मीनगर, म्हाडा कॉलनी, स्वामी समर्थनगर भागात एकवेळ व अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Water scarcity
Summer Season : उन्हाचा कडाक्यासोबत श्‍वसनाच्या त्रासाने मृत्यूचे प्रमाणही वाढले

गणेशवाडीकडे दुर्लक्ष

जुन्या आडगाव नाक्यापासून आयुर्वेद सेवा संघापर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत असून, हा भाग प्रामुख्याने कष्टकऱ्यांचा आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. ही बाब पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली असता, पाण्याच्या टाकीचे कारण दिले जात आहे. खरेतर एक पाण्याची टाकी पाडली, तर संबंधितांना दुसऱ्या ठिकाणहून पाणी पुरवठा करणे, ही विभागाची जबाबदारी आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे.

पाणीकपात एक दिवस, मनस्ताप तीन दिवस

शनिवारपासून एकदिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाणीपुरवठा खात्याने सुचित केले आहे. मात्र, याची झळ ज्यांच्याकडे विद्युत मोटारी नाहीत, त्यांना तीन दिवस बसते. शनिवारी पाणी येणार नाही, म्हणून अनेकजण शुक्रवारीच विद्युत मोटारी लावून पाणी खेचून घेतात. पर्यायाने अनेक ठिकाणी कमी दाबाने किंवा पाणीच येत नाही, अशी परिस्थिती उद्‌भवते. तर, कपातीच्या दुसऱ्या दिवशीही हिच परिस्थिती उद्‌भवते, म्हणजे संबंधितांना एकऐवजी तीनदिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

साहेब खोली बघा

पाणी पुरवठ्याबाबत म्हसरूळ भागातील एकाची व्यथा पुरेशी बोलकी आहे. येथील एकाने काल मित्रास दूरध्वनी करून नवीन खोली बघण्याचे आवाहन केले. नवीन खोली कशासाठी असा प्रश्‍न केला असता, नळाला पुरेसे पाणीच येत नसल्याचे कारण संबंधिताने दिले. यावरून पाणी टंचाईची कल्पना यावी.

Water scarcity
NMC News: मुंबई नाका ते काठेगल्लीपर्यंत गतिरोधक; नागरिकांच्या मागणीला वाहतूक पोलिसांचा प्रतिसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.