Nashik News: नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे; पावसाचे पाणी रस्ते, शेतीमध्ये साठण्याचे प्रमाण वाढले

Unauthorized construction on drains
Unauthorized construction on drainsesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : छत्रपती संभाजीनगर नाका ते मानूर फाट्यादरम्यान चौदा ते पंधरा नैसर्गिक नाले आहेत. रोडचे काम करताना या नाल्यांवर छोटेखानी पूलही बांधले आहेत. मात्र, मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील सर्व नैसर्गिक नाल्यांवर अनेक अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत.

रिणामी येथील नैसर्गिक नाले बंद होऊन पावसाचे पाणी रस्त्यांवर तसेच येथील शेतीमध्ये साठण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पंचवटी प्रभाग बैठकीत अनेकदा चर्चा होऊनही पुढे काहीच होऊ शकलेले नाही. (Unauthorized construction on natural drains Accumulation of rainwater in roads agriculture increased Nashik News)

पावसाळ्यात या महामार्गावर जवळपास दीड ते दोन फूट पाणी साठते. या साठलेल्या डबक्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. शहर स्मार्ट करायचे असेल तर सांडपाणी, तसेच पावसाळी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

जनार्दन स्वामी आश्रम ते मानूर फाटा येथील महामार्गावर अनेक नैसर्गिक नाल्यावर बांधलेल्या रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काही व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी घरे बांधून अतिक्रमण केले आहे.

परिणामी, पावसाळ्यात पाणी साठत असल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. या नैसर्गिक नाल्यांवर कोणाचाही मालकी हक्क नसतो. त्यामुळे नाल्यावर बांधण्यात आलेली घरे, शेड, वाहन बाजार, हॉटेल सर्व अतिक्रमितच आहे. ही अतिक्रमणे मनपाने काढण्याची गरज आहे.

अनेक नैसर्गिक नाल्यांवर ले- आउट टाकण्यात आल्याने मनपाच्या आजी- माजी अधिकाऱ्यांशी संगनमत करून बडे बांधकाम व्यावसायिक राजरोसपणे धंदा चालवीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

याच परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूग्राम उभारण्यात आले होते. त्या वेळी पाहणी करण्यासाठी विविध अधिकारी हजेरी लावत होते. मात्र, त्या वेळी कोणीही नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष दिले गेले नाही. आता तरी आयुक्त याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Unauthorized construction on drains
Success Story : दिव्यांग वैभव आहेरची गगनभरारी; पंजाब नॅशनल बँकेत सहाय्यक व्यवस्थापकपदी निवड

नैसर्गिक नाले ठिकाण

जनार्दन स्वामी आश्रम, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय, लक्ष्मी लॉन्स, श्रीसेवा सोसायटी, इंदू लॉन्स, रामसीता लॉन्स, आशीर्वाद लॉन्स, नांदूर नाका, हॉटेल मजा, मानूर फाटा, गोपाळबाबानगर येथे नैसर्गिक नाले आहेत.

सर्वेक्षण नाही

शहरातील नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षणच झालेले नसल्याने नाल्यांची लांबी, रुंदी, खोली, नाला कोणत्या परिसरातून वाहतो. याची माहितीच प्रशासनाकडे नाही. परिणामी, नाल्यांवर अतिक्रमण वाढत आहे,शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने संस्थेच्या आवारातून वहनाच्या नाल्यावर अतिक्रमण करून पार्किंग उभी केली आहे. शिवाय संरक्षक भिंत बांधून परिसर मालकीचा करून घेतला आहे.

Unauthorized construction on drains
Rahul Gandhi : त्यांनी राहुल गांधी यांना देऊ केले अयोध्येच्या हनुमानगढीतील घर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()