NMC News : शहरात झोपडपट्ट्या झाल्या उदंड; महापालिकेचे दुर्लक्ष

NMC News : शहरात झोपडपट्ट्या झाल्या उदंड; महापालिकेचे दुर्लक्ष
esakal
Updated on

Nashik News : महापालिकेच्या लेखी शहरात १५९ झोपडपट्ट्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याहून अधिक झोपडपट्ट्या निर्माण झाल्या असून शहराचा वाढता विस्तार, घरांच्या वाढलेल्या किमती, व्होट बँकेचे राजकारण आदी बाबी त्यास कारणीभूत ठरत आहे. (Unauthorized slums are increasing every year nashik news )

महापालिकेने घरकुल योजनेसह पंतप्रधान आवास राबविल्यानंतर झोपडपट्ट्यांची संख्या कमी होणे अपेक्षित होते. परंतु, वर्षागणिक अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये भर पडत आहे. महापालिकेने नव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली जात आहे.

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत घरकुल योजना राबविण्यासाठी महापालिकेने २००६-०७ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात शहरात खासगी, महापालिका व शासकीय जागांवर १५९ झोपडपट्ट्या आढळून आल्या, तर ४१ हजार ४०७ झोपड्यांमध्ये सुमारे दोन लाख लोकसंख्या असल्याचे आढळून आले.

त्यानंतर घरकुल योजना राबविण्यात आली. घरकुल योजनेत सोळा हजार सदनिका उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु योजनेची व्याप्ती कमी करतं सात हजार घरकुलांपर्यंत संख्या आली. मागील सतरा वर्षापासून १५९ झोपडपट्ट्यांची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वाढतं आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अधिकृत झोपडपट्ट्यांनाच लागून समांतर नवीन झोपडपट्टी तयार झाल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NMC News : शहरात झोपडपट्ट्या झाल्या उदंड; महापालिकेचे दुर्लक्ष
Nashik News: दिंडोरी रोडवर पुन्हा 29 उंट ताब्यात; पांजरपोळ येथे 111 उंटांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

तेथेच झोपडपट्ट्यांची संख्या दुप्पट झाल्या आहेत. या झोपड्या अचानक तयार झाल्या नाहीत. अनेक वर्षांपासून झोपड्या तयार होत असताना स्वतःच्या जागा शासकीय यंत्रणांना वाचविता आल्या नाहीत.

आता या झोपड्या मतपेटीच्या राजकारणासाठी हक्काचे स्थान बनल्या आहेत. भाई-दादांचे वर्चस्व निर्माण झाल्याने शासन यंत्रणादेखील झोपड्या हटविण्यास धजावत नसल्याचे वास्तव आहे. जागांचे वाढते भाव, वाढती लोकसंख्या व व्होट बँकेचे राजकारण हे कारण त्यामागे आहेत.

अशा आहेत अधिकृत झोपड्या

पश्‍चिम विभाग : कस्तुरबानगर, रामदूतवाडी, किस्मत बाग, क्रांतिनगर, जुने जिल्हा रुग्णालय, रसूलबाग.

पूर्व विभाग : संत कबीरनगर, शिवाजीवाडी, आगरटाकळी, आंबेडकरवाडी, इंदिरानगर.
सिडको : इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर, राजीवनगर.

नाशिक रोड : सुंदरनगर, वडारवाडी, आम्रपाली, साठेनगर, आंबेडकरनगर, राजीवनगर, श्रमिकनगर (कॅनॉल रोड).

NMC News : शहरात झोपडपट्ट्या झाल्या उदंड; महापालिकेचे दुर्लक्ष
Autothon 2023 : व्रूम...व्रूम...च्या आवाजाने तरुणाई रोमांचित! ऑटोथॉन 2023 ला दमदार आणि उत्साहात सुरवात

पंचवटी : अवधूतवाडी, भराडवाडी, दत्तनगर, महात्मा फुलेनगर, राहुलवाडी, संजयनगर, वडारवाडी, वडनगर, हिरावाडी, मकुरवाडी, वज्रेश्‍वरी.

सातपूर : महादेववाडी, उत्कर्षनगर, प्रबुद्धनगर, संतोषीमातानगर, स्वारबाबानगर, वडारवाडी, बजरंगनगर, कांबळेवाडी, कोळीवाडा, शिवनगर, सिद्धार्थनगर.

शासकीय जागांवर २९ झोपड्या

विभाग महापालिका शासकीय झोपड्यांची संख्या

पश्‍चिम ०२ ०४ ३६३
पूर्व ०२ ०३ २५४५
नाशिक रोड ०० ०७ १९८३
सिडको ०० ०३ १३२९
सातपूर ०२ ०९ ४९१७
पंचवटी ०८ ०३ ६०२३

एकूण १४ २९ १७,१२०

NMC News : शहरात झोपडपट्ट्या झाल्या उदंड; महापालिकेचे दुर्लक्ष
Sinnar Unseasonal Rain : सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.