Water Connection Inspection Campaign : शहरात अनधिकृत नळजोडणी तपासणी मोहीम

Water Connection news
Water Connection newsesakal
Updated on

नाशिक : शहरामध्ये सव्वाचार लाख मिळकत संख्या असताना नळधारकांची संख्या मात्र जवळपास दोन लाख असल्याने अनधिकृत नळ जोडण्याची संख्या अधिक असल्याचा संशय पाणीपुरवठा विभागाला आहे. त्या अनुषंगाने नळजोडणी शोधण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा हजारांहून अधिक नळजोडणी अनधिकृत असल्याचा संशय आहे. (Unauthorized water connection inspection campaign in city by NMC nashik News)

नाशिक महापालिकेच्या कर वसुलीत घट निर्माण झाल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले जात आहे. त्यापूर्वी थकबाकीदारांकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता करात वाढ करतानाच पाणीपट्टी वसुलीकडेदेखील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष वेधले आहे. पाणीपट्टीची देयके ग्राहकांना वेळेत पोचत नसल्याची बाब आहेच. त्या व्यतिरिक्त नळ जोडण्याची संख्यादेखील अधिक असल्याचा संशय आहे.

त्या अनुषंगाने शहरात नळ जोडण्या शोधण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सव्वाचार लाख मिळकतींची संख्या नोंदविण्यात आली आहे मात्र त्या तुलनेत नळधारकांची संख्या अवघे दोन लाख दोन हजार असल्याने पाणी चोरी होत असल्याचा संशय आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अंदाजानुसार दहा हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळ जोडणे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Water Connection news
Nashik : सायखेडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा बोटिंग करतांना बुडून दुर्दैवी मृत्यू

अनधिकृत नळ जोडण्यात मागे प्लंबर कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणे दिली जात असली तरी पाणी वापराचे देयके मात्र मिळकत विभागाकडून दिली जातात. या दोन्ही विभागांचा परस्परांशी ताळमेळ नसल्याने अनधिकृत नळ धारकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर कर वसुली विभाग व पाणीपुरवठा विभागाकडून संयुक्तरीत्या शोध मोहीम राबविली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी माहिती दिली.

पंचवटीत सर्वाधिक नळ कनेक्शन

महापालिकेच्या दप्तरी दोन लाख २ हजार ६२६ जोडण्याची नोंदणी आहे. यामध्ये सर्वाधिक नळजोडणी सिडको विभागात ५५ हजार ६५० इतकी आहे. त्या खालोखाल पंचवटी विभागात ४२ हजार ९८८ असून, नाशिक रोड विभागात ३३,३४५ नळ जोडण्या आहेत. सातपूर विभागात ३०,०३०९, तर पूर्व विभागात २९ हजार ७३२ नळ जोडण्या आहेत. सर्वात कमी नळ जोडण्या नाशिक पश्चिम विभागात १०,७०२ आहे.

Water Connection news
Nashik Crime News : आजीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांसमोर आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.