NMC News : 10 हजार झाडे वेदनामुक्त! ‘खिळेमुक्त’ मोहिमेत जाहिरातदारांवर गुन्हे

Nail Free Tree campaign
Nail Free Tree campaignesakal
Updated on

Nashik News : शहरामध्ये असलेल्या वृक्षसंपदेला जाहिरातदारांकडून मोठ्या प्रमाणात इजा पोचविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षप्रेमींच्या मागणीनुसार महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ‘खिळेमुक्त वृक्ष’ मोहीम राबविली. (under Nail Free Tree campaign of nmc 10 thousand nail was removed from tree nashik news)

या मोहिमेच्या माध्यमातून दहा हजाराहून अधिक वृक्षांवरील खिळे उपटण्यात आले, तर वृक्षांवर जाहिरात लावणाऱ्या २० आस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

२२ ते २८ एप्रिलदरम्यान वसुंधरा सप्ताह साजरा केला जातो. त्या अंतर्गत महापालिकेकडून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा २८ एप्रिलला समारोप होणार आहे. समारोपाच्या दिवशी महापालिकेच्या सहा विभागात उद्यान विभागाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड अभियान राबविले जाणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या खिळेमुक्त अभियानाची माहिती देण्यात आली. महापालिका हद्दीमध्ये वृक्षतोडीस बंदी आहे. ज्या भागात वृक्ष तोडायचे असेल, त्या संबंधित व्यक्तीला परवानगीचा ससेमिरा पार पाडावा लागतो. त्यानंतरही परवानगी न मिळाल्यास वृक्षतोड करता येत नाही. त्याचबरोबर महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षांना इजा पोचवणाऱ्यांवरदेखील कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Nail Free Tree campaign
Sugarcane Juice : शहरात 300 टन उसाची आयात! उसाच्या गुऱ्हाळावर नागरिकांची गर्दी

शहरात जवळपास ५० लाखांपेक्षा अधिक वृक्षसंपदा आहे. मुख्य रस्त्यांवरील वृक्षांवर मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. जाहिरात लटकवण्यासाठी खिळे ठोकले जातात. यातून वृक्षांची मोठी हानी होते. त्याअनुषंगाने खिळेमुक्त वृक्ष अभियान राबविण्यात आले. यात दहा हजार पेक्षाही अधिक वृक्ष खिळेमुक्त करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणाऱ्या वीसहून अधिक आस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल करून दंड करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत पंचवटी उद्यान विभागाकडून पेठ फाटा येथील नाल्यातील प्लॅस्टिक जमा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पश्चिम विभागात उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथे शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

"वृक्षांना खिळे मारून इजा करणाऱ्याविरोधात उद्यान विभागाने मोहीम हाती घेतली आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे." - विजयकुमार मुंडे, उद्यान उपायुक्त, महापालिका.

Nail Free Tree campaign
NMC Market Fee : बाजार फी वसुलीला महासभेची Green Light!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.