नाशिक : पावसाळी किंवा भुयारी गटारी एकदा जमीन खोदून आत टाकल्यानंतर कोण तपासणार, याचा फायदा घेत मलनिस्सारणासाठी सुमार दर्जाचे पाइप टाकले जातात. विशेष म्हणजे गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून आशीर्वाद मिळाल्याशिवाय हे काम शक्य नसल्याचे बोलले जात आहे. बांधकाम, उद्यान, पाणीपुरवठा, विद्युत तसेच मलनिस्सारण विभागामार्फत होणाऱ्या कामकाजाची गुणवत्ता तपासण्याचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून केले जाते. (under soil pipe do job of sewerage Quality department Nashik Latest Marathi News)
या विभागासाठी एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता, एक ज्युनिअर इंजिनिअर व असिस्टंट ज्युनिअर इंजिनिअर असा स्टाफ आहे. कामांची गुणवत्ता सांभाळण्याचे काम या विभागाच्या माध्यमातून केले जाते. या विभागाने पॉझिटिव्ह शेरा मारल्याशिवाय देयके काढली जात नाही. याचाच अर्थ चुकीच्या कामांना ब्रेक लावण्याचे कार्य या विभागामार्फत चालते. मात्र, गेल्या वर्षभरापासून या विभागाचे कामकाज अनियंत्रित गुणवत्तेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते वाहून गेले. त्यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांबरोबरच विविध विभागांमार्फत झालेल्या कामांची गुणवत्तादेखील तपासण्याची गरज निर्माण झाली असून, तशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
मलनिस्सारण प्रकल्पात हातमिळवणी
मलनिस्सारण कामे करताना पाइपचे डायमीटर, कॉलर पाईपची गुणवत्ता तपासली जात नाही. व्हॉल बसविताना ते सुमार दर्जाचे बसविले जातात. कागदोपत्री मात्र दर्जा चांगला दाखविला जातो. पाईपची गुणवत्ता राखणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय असताना प्रत्यक्षात मात्र पाइपच्या टेस्ट न करता सुमार दर्जाचे पाइप मलनिस्सारणासाठी वापरले जातात. यात कंत्राटदारांशी गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकारी हातमिळवणी करून उद्योग सुरू ठेवतात, असा आरोप केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.