Nashik Job News : बेरोजगारी उदार, तरी नोकरीसाठी मिळेना पात्र उमेदवार..! रोजगार मेळाव्यातील स्‍थिती

 unemployed well educated people also not getting job nashik news
unemployed well educated people also not getting job nashik newssakal
Updated on

Sakal Exclusive : प्रतिष्ठेचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, काहींनी पदव्‍युत्तर पदवीपर्यंतही मजल मारली, तरी बेरोजगारीला सामोरे जाणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.

दुसरीकडे कंपन्‍यांना कुशल मनुष्यबळाची गरज असून, त्यांची पूर्तता होत नाही, असे परस्‍पर विरोधाभासी अन् विदारक सामाजिक स्‍थितीचे दर्शन रोजगार मेळाव्‍याच्‍या आकडेवारीतून दिसून येते. ‘बेरोजगारी उदार तरी नोकरीसाठी मिळेना पात्र उमेदवार’ अशी काहीशी परिस्‍थिती नाशिक जिल्ह्या‍‍त आढळून येत आहे. (unemployed well educated people also not getting job nashik news)

दर वर्षी पदवी, पदव्‍युत्तर पदवीचे शिक्षण घेऊन हजारो उमेदवार महाविद्यालय, इन्‍स्‍टिट्यूटच्या ‍बाहेर पडत आहेत. काहींना शिक्षणादरम्‍यान कॅम्‍पस ड्राइव्‍हद्वारे रोजगाराची संधीही मिळते. सर्वांचीच निवड होऊ शकत नाही. अशात शिक्षणक्रम पूर्ण केल्‍यानंतर युवकांकडून नोकरीचा शोध सुरू होतो. अशा बेरोजगारांची संख्या मोठी असली तरी दुसरीकडे कंपन्‍यांना कुशल मनुष्यबळच मिळत नसल्‍याचे रोजगार मेळाव्यातील आकडेवारीतून समोर येत आहे.

जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे वेळोवेळी रोजगार मेळावे घेतले जातात. या माध्यमातून कंपनी आणि उमेदवार यांच्‍यात समन्‍वय साधला जातो. रीतसर जागांचा तपशील जाहीर केला जातो. मेळाव्‍यांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसादही मिळतो. परंतु जेव्‍हा निवड झालेल्‍या उमेदवारांच्‍या संख्येकडे नजर पडते, तेव्‍हा ही गंभीर समस्‍या लक्ष वेधते.

आकडे बोलतात...

- या वर्षी एप्रिल व मेमध्ये एकूण चार रोजगार मेळावे झाले. ४५ कंपन्‍यांकडून चार हजार ७८३ जागा उपलब्‍ध होत्‍या. परंतु मेळाव्‍यात अवघ्या एक हजार ८८२ उमेदवारांची नियोक्‍त्‍यांकडून प्राथमिक निवड झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 unemployed well educated people also not getting job nashik news
Netflix Jobs: नेटफ्लिक्स देतंय बंपर नोकरीची ऑफर! पगार ऐकून बसेल धक्का

- ‘शासन आपल्‍या दारी’ उपक्रमांतर्गत या वर्षी १५ जुलैला झालेल्‍या रोजगार मेळाव्‍यात नऊ हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. रिक्‍त पदांची संख्या साडेचार हजार असताना प्रत्‍यक्षात सुमारे दोन हजार ४०० उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.

- एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षभरात सोळा रोजगार मेळावे झाले. १५६ कंपन्‍यांनी सहभागी होताना ११ हजार ८५२ जागा उपलब्‍ध होत्‍या. मात्र प्राथमिक निवड झालेल्‍या उमेदवारांची संख्या अवघी दोन हजार ६१८ होती.

म्‍हणून हुकते रोजगाराची संधी...

* पगाराविषयी उमेदवारांच्‍या अवाजवी अपेक्षा

* नियोक्‍त्‍यांना आवश्‍यक कुशल मनुष्यबळाचा अभाव

* कारखान्‍यात हात खराब करून कामाची मानसिकता नसणे

* मेट्रो शहरांकडेच उमेदवारांचा ओढा अधिक

* कॅबिनमध्ये बसून कामाची अपेक्षा, मोजकेच तास हवे असते काम

समुपदेशनाची गरज

नियोक्‍त्‍यांना कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. तर उमेदवारही नोकरीच्‍या शोधात असतात. परंतु संवादातील अभावामुळे दोन्‍ही घटकांच्‍या अपेक्षांची पूर्ती होत नाही. ही परिस्‍थिती बदलण्यासाठी उमेदवारांचे समुपदेशन होण्याची गरज आहे. सत्‍यपरिस्‍थितीची जाणीव करून देताना, योग्‍य समन्‍वय साधल्‍यास ही समस्‍या सुटू शकते, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जात आहे.

 unemployed well educated people also not getting job nashik news
Indian Railways Jobs: भारतीय रेल्वेमध्ये 2.5 लाख पदं रिक्त; सरकारनं संसदेत दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.