School Opening: विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय! इंदिरानगर, पाथर्डी फाटा परिसरात जल्लोषात स्वागत

Actress Saili Patil, Gopal Patil, Sharad Geete etc. during the publication of information sheet
Actress Saili Patil, Gopal Patil, Sharad Geete etc. during the publication of information sheetesakal
Updated on

School Opening : इंदिरानगर परिसरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.

डे केअर सेंटर शाळेत शाळेची माजी विद्यार्थिनी आणि अभिनेत्री सायली पाटील हिच्या उपस्थितीत आनंदमेळावा घेत साजरा करण्यात आला. (Unforgettable first day of students Indira Nagar Pathardi Phata area students welcomed with jubilation at school nashik news)
hav6/15/2023 3:32:55 PMStory Editedmdtushar6/15/2023 3:39:08 PMProof and Move Story to Pages: NSKTDY2mdtushar6/15/2023 3:39:10 PMStory marked as Ready to Pages: NSKTDY2, & Locations

शिवराज्याभिषेक संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांची वेशभूषा केली होती.

संस्थेचे अध्यक्ष ॲड ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, ॲड. अंजली पाटील, संचालिका छाया निखाडे, वसंतराव कुलकर्णी, अजय ब्रम्हेचा, अनिल भंडारी, अधीक्षिका ॲड. डॉ. मुग्धा सापटणेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

आनंदवन बालमंदिराच्या मुख्याध्यापिका पूनम सोनवणे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गिते, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विद्या अहिरे, वेदश्री पाटील, तनुजा कुलकर्णी उपस्थित होते.

परिसरात वृक्षपूजन करण्यात आले. या वेळी दहावी व बारावीत प्रथम आलेल्या आणि प्रतिकूल परिस्थिती, दिव्यांगावर मात करीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बालवाडी विभागाच्या माहिती पत्रकाचे आणि ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ या नावाने छापण्यात आलेल्या बालवाडी विभागाच्या पुस्तकांचे प्रकाशनदेखील करण्यात आले.
शिवकालीन प्रात्यक्षिके लाठीकाठी, नेमबाजी, भालाफेक, तलवारबाजी सादर करण्यात आली.

भाग्यश्री सापटणेकर आणि तेजस्विनी गवारे या दोघींनी शिवकालीन काठी युद्धाचे कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांनी लेझीमचे विविध प्रकार सादर केले व पालकांनी लेझीम नृत्यावर आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल धनवटे यांनी केले. हेमलता पाठक यांनी आभार मानले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Actress Saili Patil, Gopal Patil, Sharad Geete etc. during the publication of information sheet
School Opening : कारमधून मिरवणुक काढत कंधाणेतील शाळेत नवागतांचे स्वागत

सुखदेव शाळेत मुलांचे औक्षण

सुखदेव शाळेत नवागतांचे स्वागत अभिनव पद्धतीने करण्यात आले. हळदी कुंकवाच्या ताटात हाताचा पंजा बुडवून त्याचे ठसे उमटवत या चिमुकल्याचा मनपाचे माजी अभियंता उद्धव गांगुर्डे, पाथर्डीचे तलाठी नितीन शिरसाट, संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, सरचिटणीस संजय काळे, मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राचार्य बाबासाहेब खरोटे यांनी शाळेत प्रवेश करून दिला.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या साक्षीने मुलांचे औक्षण करून त्यांना पेन्सिल, खोडरबर व मिठाई देण्यात आली. बालवाडी व पहिलीच्या वर्गशिक्षिका सरला सोनवणे, सुचिता कंसारा, रेखा बागूल, जयश्री मोरे यांनी आनंदोत्सव साजरा केला.

चिमुकल्यांच्या हस्ते शालेय परिसरात वड, पिंपळ व लिंब या दीर्घायुषी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. कविता पवार यांनी सूत्रसंचालन केले. मनिषा बोरसे, सुनील जाधव, संदीप नागरे, भारती जाधव, अनिता अहिरे, देवयानी घोडगे, रूपाली सोनटक्के, सुलोचना दाते, योगेश जाधव, नंदकुमार झणकर, श्रीमंत डंबाळे आदींनी संयोजन केले.

धनलक्ष्मी शाळा

पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी शाळेत ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढली विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. मुलांना भेट म्हणून मुकुट, स्मायली, हॅन्ड बॅन्ड देण्यात आले.

जंगलं बुक या संकल्पनेने नुसार शालेय परिसर व वर्ग तयार करण्यात आले होते. संस्थाप्रमुख प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

सामूहिक परिपाठ घेण्यात आला पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपमुख्याध्यापिका पूनम पाटील, वैशाली तांबे, गया पानसरे आदींनी संयोजन केले.

Actress Saili Patil, Gopal Patil, Sharad Geete etc. during the publication of information sheet
School Start: नवागतांचे रथ अन्‌ बैलगाडीतून आगमन! इगतपूरीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.