Valentines Day 2024: प्रेमाची कबुलीने ‘व्हॅलेंटाइन डे’ अविस्मरणीय! महाविद्यालयीन परिसरात उत्साह

व्हॅलेंटाइन वीकनंतर आज महत्त्वाचा दिवस असणारा व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर सर्वत्र बघायला मिळाला.
Valentines Day 2024
Valentines Day 2024esakal
Updated on

नाशिक : व्हॅलेंटाइन वीकनंतर आज महत्त्वाचा दिवस असणारा व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर सर्वत्र बघायला मिळाला. अनेकांनी आजचा दिवस खास ठरावा म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी केली होती. होकार मिळेल की नकार याची धाकधूक बाळगत अनेक तरूणांनी प्रेमाची कबुली दिली. त्याचबरोबर डेटिंग ॲपवर डेली बोलणाऱ्या पण प्रत्यक्ष न भेटलेल्या कपल्सनी फर्स्ट डेटवर जाणे पसंत केले. (Unforgettable Valentine's Day 2024 with confession of love Enthusiasm in college nashik news)

प्रेमाची कबुली म्हणजे फर्स्ट डेट आणि ही डेट खास ठरावी म्हणून शहरातील अनेक रेस्ट्रॉरंट आधीच बुक झाली होती. मैत्रिणीला खास सरप्राईज मिळावे म्हणून तरूणांनी त्याचे आधीच नियोजन केले होते.

आवडते पदार्थ, चॉकलेट, रिंग, टेबलची सजावट, गुलाबी-लाल रंगाची फुगे यासाठी रेस्ट्रॉरंटमध्ये खास तयारी करण्यात आली होती. तसेच विशेष सवलत देण्यात आली होती. कॉलेज रोड, गंगापूर रोड महाविद्यालयीन परिसरात तरुणांमध्ये उत्साह बघायला मिळाला.

इन्टाग्रामवर स्टेट्स शेअर करत अनेकांनी प्रेमाची कबुली दिली. त्याचबरोबर व्हिडिओ, रिलमध्ये व्हॅलेंटाइन डे सर्वात जास्त ट्रेडिंगमध्ये राहिला. अनेकांनी प्रेमाचा संदेश देत व्हॅलेंटाइन डे साजरा केला.

Valentines Day 2024
Valentine Day 2024 : व्हॅलेंटाइन’दिनी ३८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने बांधली ‘लग्नगाठ’

"आपण आपल्या जोडीदारावर प्रेम तर करतोच पण आज त्याच प्रेमाचा उत्साह साजरा करण्याचा आजचा दिवस आहे. या दिवशी एक वेगळाच उत्साह असतो."-भूषण भावसार

"रोजच्या धावपळीत आपण व्यस्त असतो त्यामुळे प्रेमाचे सेलिब्रेशन करण्याचा हा दिवस. आयुष्यभराचा जोडीदार देखील या दिवशी आपल्याला मिळतो. मात्र या प्रेमसंबंध अडकताना आपली फसवणूक तर होत नाहीये ही सावधानता बाळगली पाहिजे."- प्रियांका घुगे.

"व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही, कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही तर ही जन्मोजन्मीची असावी. प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमात गोडी येत नसते आणि रागावून गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्त्व कळत नाही.- प्रांजली पवार

Valentines Day 2024
Wedding on Valentine Day: ‘व्हॅलेंटाइन’दिनी ३८ जोडप्यांनी बांधली ‘लग्नगाठ’; नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या घटली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.