Nashik News: वाळूचा एक कणही घेऊ देणार नाही! भऊर, विठेवाडी, सावकी गावांचा एकमुखी निर्णय

Officials and farmers from Bhaur, Savaki, Vithewadi, Khamkheda protesting sand extraction from the Girna riverbed at Bhaur (Devla).
Officials and farmers from Bhaur, Savaki, Vithewadi, Khamkheda protesting sand extraction from the Girna riverbed at Bhaur (Devla).esakal
Updated on

Nashik News : गिरणा नदीपात्रात वाळू राहिली तरच आमच्या शेतीसाठीच्या पाण्याचे स्रोत टिकून राहतील अन्यथा आमचा शेती व्यवसाय उद्ध्वस्त होईल, त्यामुळे आमच्या शिवार काठावरील गिरणा नदीतील वाळूचा एक कणही आम्ही घेऊ देणार नाही,

भले त्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी बेहत्तर असा एकमुखी निर्णय तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा व इतर गावातील नागरिकांनी घेत गावातील नागरिकांनी गिरणा नदीपात्रात उतरत वाळू उपसा करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. (Unilateral decision of Bhaur Vithewadi Savaki villages about sand transport Nashik News)

नवीन वाळू धोरणानुसार देवळा तालुक्यात चार घाटांवर साधारणतः चाळीस हजार ब्रास वाळूसाठी निविदा प्रक्रिया काढल्या जात आहेत. अवैध वाळू उपास चोरी रोखण्यासाठी शासनाने स्वतः वाळू धोरण ठरवून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील काही गावातील प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी एकत्र येत घाटावरील वाळू उपसा करण्यात तीव्र विरोध दर्शवला.

शासनाने वाळू उपसाबाबत घेतलेला निर्णय आम्हास अमान्य असून जर वाळू उचलण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि एवढे करूनही शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर प्रसंगी आम्ही आत्मदहनही करू असा इशारा यावेळी येथील ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Officials and farmers from Bhaur, Savaki, Vithewadi, Khamkheda protesting sand extraction from the Girna riverbed at Bhaur (Devla).
Nandurbar: चक्क आमदारच ट्रॅक्टर चालवतात तेव्हा...! आमदार पाडवींच्या बळीराजा स्टाइलची सोशल मीडियावर धूम

यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपजिल्हाप्रमुख सुनील पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम, बाजार समितीचे संचालक अभिमन पवार, सरपंच वैभव पवार, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पवार,

तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष पवार, नितीन पवार, पांडुरंग पवार, गंगाधर पवार, माजी सरपंच दादा मोरे, मिलिंद पवार, राजेंद्र पवार, बाजार समितीचे माजी संचालक बाबूराव निकम, संजय पवार, पोपट पवार,

दला पवार, खंडू माळी, नामदेव पवार, रवींद्र पवार, शशिकांत निकम, विलास निकम, राजेंद्र निकम, भास्कर निकम, विठोबा सोनवणे, दादाजी सोनवणे, धना निकम, संजय निकम, काशिनाथ बोरसे, श्रावण बोरसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"वाळू लिलाव होऊन तसा उपसा सुरू केल्यास नदीतील पाणी वाहून जाईल. त्यामुळे येथील पाण्याचे स्रोत नष्ट होतील आणि शेती उद्धवस्त होऊ लागेल. त्यामुळे येथून वाळू उपसा करण्यास आमचा सक्त विरोध आहे." -सुनील पवार, उपजिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव ठाकरे)

Officials and farmers from Bhaur, Savaki, Vithewadi, Khamkheda protesting sand extraction from the Girna riverbed at Bhaur (Devla).
Unseasonal Rain : अवकाळीमुळे कोबी बियाणे टाकण्यावर परिणाम; सामान्य वातावरणाची बळिराजाला प्रतिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.