(भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा)
नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग बघता यंदा आषाढी एकादशी निमित्ताने सर्व नागरिकांनी घरच्या घरीच पूजा केली आहे. गेली काही दिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुस्लिम बांधवाकडे संशयाच्या नजरेतून बघितलं जात असतांना नाशिकच्या हॅपी होम कॉलनी परिसरातील रेहान अकबर शेख या १३ वर्षीय बालकाच्या अनोख्या भक्तीने सारेच भारावले आहेत..नेमके काय केले या बालकाने?
नाशिकच्या रेहान शेखची अनोखी विठ्ठलभक्ती.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग बघता यंदा आषाढी एकादशी निमित्ताने सर्व नागरिकांनी घरच्या घरीच पूजा केली आहे. गेली काही दिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुस्लिम बांधवाकडे संशयाच्या नजरेतून बघितलं जात असतांना नाशिकच्या हॅपी होम कॉलनी परिसरातील रेहान अकबर शेख या १३ वर्षीय बालकाने विठ्ठलाप्रति असलेली सेवाभक्ती विठ्ठल रखुमाईचे चित्र साकारत त्या चित्राची मनोभावे पूजा देखील केली आहे. रेहानने यातून समाजात ऐक्याची व समानतेची भावनेचे दर्शन घडविले आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे चित्र साकारत केली मनोभावे पूजा.
यानिमित्ताने त्याच्याशी सकाळ ने संवाद साधला असता माझ्यासाठी हिंदू धर्मातील सर्व सण उत्सव माझ्यासाठी प्रिय असल्याचे रेहानने सांगितले. रेहानला लहान पणापासूनच देवांप्रती प्रचंड आवड भावना असल्याने सर्वच सण उत्सव साजरे करतो. आजपर्यंत रेहानने सर्व देवी देवतांची चित्रे रेखाटली आहेत. सण-उत्सवांच्या निमित्ताने रेहान नेहमीच चित्र रेखाटून पूजा- अर्चना करत असतो. अशाप्रकारे चिमुकला रेहान समाजात ऐक्याची भावना निर्माण करण्याचे काम करत आहे.
वयाच्या सातव्या वर्षांपासून देवी देवतांच्या चित्र रेखाटण्याची आवड
आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेखाटलेले विठ्ठल- रुक्मिणीचे चित्र व तुळशी पाटावर ठेवून पूजा केली तसेच देवाला कोरोनाचे संकट लवकरात लवकर कमी होण्यासाठी साकडं देखील घातले. वयाच्या सातव्या वर्षांपासून देवी देवतांच्या चित्र रेखाटण्याची आवड जडली. त्यात सर्वधर्म समभाव राखण्यासाठी रेहान व त्याचे मित्र एकत्रितपणे सण- उत्सव साजरा करतात. आदर्श विद्यालयात शिकणारा रेहान व त्याचे मित्र परिवार हे ईद व मोहरम प्रमाणेच गणपती ,दिवाळी साजरा करण्यासाठी एकत्रित जमतात.
रेहान अकबर शेख म्हणतोय...
वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच हिंदू धर्मातील विविध देवदेवतांच्या होणाऱ्या पूजाअर्चाबद्दल वेगळं आकर्षण व गोडी निर्माण झाली होती. ती आवड कशी पूर्ण करता येईल यासाठी चित्र रेखाटायला सुरुवात केली. प्रत्येक सण- उत्सवाला मी एकात्मता जपण्यासाठी विविध चित्रे रेखाटून त्यांची पूजा करीत असतो. आज एकादशी असल्याने विठ्ठल- रुख्मिणीच्या फोटोची स्थापना करून पूजा केली. - रेहान अकबर शेख, विद्यार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.