Lakshmi Pujan: लालपरीला औक्षण करीत अनोखे लक्ष्मीपुजन! एसटीला लक्ष्मी मानत व्यावसायिकांकडून मनोभावे पुजा

Dadaji Aher along with Rohini Aher, Rajendra Aher, Bhushan Aher and the driver-carrier while performing puja of Nashik-Nandurbar bus on the occasion of Lakshmi Pujan at Deola bus station.
Dadaji Aher along with Rohini Aher, Rajendra Aher, Bhushan Aher and the driver-carrier while performing puja of Nashik-Nandurbar bus on the occasion of Lakshmi Pujan at Deola bus station.esakal
Updated on

देवळा : येथील बसस्थानकात रविवारी (ता.१२) रोजी एसटी बस (लालपरी) आणि चालक, वाहकाचे पूजन करत अनोखे लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले.

ज्या बससेवेमुळे बसस्थानकांमध्ये रोजगार उपलब्ध होतो त्या एसटी बसेसला लक्ष्मी मानत येथील व्यावसायिकांनी मनोभावे बसचे पूजन केले. (Unique Lakshmi Pujan by worshiping Lalpari Professionals worship MSRTC Bus as Lakshmi nashik)

यावेळी देवळा बसस्थानकात आलेल्या नाशिक-नंदुरबार या बसचे पूजन येथील सप्तश्रृंगी जनरल स्टोअर्सचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दादाजी आहेर व रोहिणी आहेर या दाम्पत्याने केले.

तसेच सटाणा आगारप्रमुख राजेंद्र आहिरे, वाहतूक नियंत्रक भूषण आहेर, चालक-वाहक गणेश देवरे, योगेश आहेर, जे.एम.अहिरराव, कैलास बागूल, आर.एस.जाधव, पी.डी. जाधव, कैलास शिरसाठ यांचाही भेटवस्तू व फराळ देत सन्मान करण्यात आला.

बसस्थानकातून नाशिक, नगर, सटाणा, नंदुरबार, कळवण, सप्तश्रृंगी गड, मालेगाव, धुळे अशा अनेक बसेसची रोज ये-जा चालू असते. यामुळे प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असल्याने येथील लहानमोठ्या सर्वच व्यावसायिकांना छोटा-मोठा व्यवसाय करता येतो.

या पार्श्वभूमीवर एसटी बसबद्दल कृतज्ञता व्यक्त करत व बससेवेलाच लक्ष्मी मानत हे लक्ष्मीपूजन करण्यात आले. एसटी बसला नारळाच्या झावळ्यांनी व फुलमाळांनी सजवत आणि पूजन करून फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला.

Dadaji Aher along with Rohini Aher, Rajendra Aher, Bhushan Aher and the driver-carrier while performing puja of Nashik-Nandurbar bus on the occasion of Lakshmi Pujan at Deola bus station.
Lakshmi Pujan 2023: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत 20 टक्क्यांची वाढ! व्यावसायिकांमध्ये उत्साह

यावेळी माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरप्रमुख दिलीप पाटील, मधुकर आहेर, कामिनी आहेर, रोहित आहेर, तात्या करंकाळ, अक्रम तांबोळी, करन शिरसाठ, रोशन खैरनार, कैलास पवार, सोमनाथ कानडे आदी कार्यकर्ते, व्यावसायिक व प्रवासी उपस्थित होते.

"कोरोनाचे संकट, बसचा संप यातून बाहेर निघत नवनवीन योजनांच्या माध्यमातून एसटी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सोयीसाठी गतिमान होत आहे. रोजगार निर्मितीतून व्यवसायास चालना देण्यासाठी बस एक उपयुक्त माध्यम सिद्ध होत आहे."- राजेंद्र आहिरे, सटाणा आगारप्रमुख.

"बसस्थानक हेच आमचे मंदिर आणि एसटी बस अन प्रवासी हेच आमचे दैवत आम्ही मानतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही सर्व व्यवसाय बंधू एसटीचे पूजन करतो."

- दादाजी आहेर, देवळा

Dadaji Aher along with Rohini Aher, Rajendra Aher, Bhushan Aher and the driver-carrier while performing puja of Nashik-Nandurbar bus on the occasion of Lakshmi Pujan at Deola bus station.
Lakshmi Pujan 2023: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत 20 टक्क्यांची वाढ! व्यावसायिकांमध्ये उत्साह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.