Religious unity : आषाढीनिमित्त गोदाकाठी असेही अनोखे धार्मिक ऐक्य!

बकरी ईदची ‘त्या’ दिवशीची कुर्बानी दुसऱ्या दिवशी करण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय
Muslim brothers and citizens of the village in the area attended the meeting held at Saykheda.
Muslim brothers and citizens of the village in the area attended the meeting held at Saykheda.esakal
Updated on

Religious unity : येत्या गुरुवारी (ता.२०) साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत आहे.

त्यामुळे ईदनिमित्त सकाळी नमाज पठण करत त्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा कौतुकास्पद निर्णय सायखेडा पोलिस ठाणे हद्दीतील सर्व मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. (Unique religious unity even in chandori on occasion of Ashadhi ekadashi bakari eid nashik news)

यंदा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण एकाच दिवशी आहे. या पार्श्वभूमीवर सायखेडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी मंगळवारी (ता.२०) ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या.

मात्र बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.

त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. धर्माच्या नावावर हिंसा भडकावणाऱ्यांनी यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

बैठकीला चांदोरीचे सरपंच विनायक खरात, तुषार खरात, उपसभापती जगन्नाथ कुटे, सचिन गडाख, घनशाम जोंधळे, भाऊसाहेब कातकडे, मेहमूद इब्राहिम शेख, मझहर पठाण, जैनुद्दीन शेख, सादिक पटेल, अश्पाक शेख, फिरोज शेख, साहिल शेख, आरिफ इनामदार, हिरामण फड, सागर बोडके, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर खरात, प्रेम कटारे, कृष्णा इंदे, रामेश्वर खालकर, संतोष कडभाने, अरुण घुगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Muslim brothers and citizens of the village in the area attended the meeting held at Saykheda.
MPSC Success Story: कळवणच्या कल्पेशने घातली सहाय्यक नगर रचनाकार पदाला गवसणी!

"मुस्लिम समाजातर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही जनावरांची कुर्बानी दिली जाणार नाही, असा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पोलिसांनी केलेल्या आवाहनाचे पालन करण्याचा निर्णयास आमचाही पाठिंबा असेल."

- आरिफ गुलाब इनामदार, माजी सरपंच औरंगपूर

"सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बांधवांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून माजी त्रिदल सैनिक संघटनेतर्फे नक्कीच स्वागत करतो."

- तुषार खरात, अध्यक्ष, निफाड तालुका त्रिदल.

"कायदा सुव्यवस्थेचे पालन करताना सर्व नागरिकांनी धार्मिक सलोखा जपला जावा यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. मुस्लिम बांधवांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद आणि इतरांनीही अनुकरणीय असे आहे."

- पी. वाय. कादरी, सहायक पोलिस निरीक्षक, सायखेडा पोलिस ठाणे.

Muslim brothers and citizens of the village in the area attended the meeting held at Saykheda.
Success Story : ‘मन की बात’ मध्ये शुभमच्या कामगिरीचा गौरव; पंतप्रधानांनी दखल घेतल्याने नाशिकचे नाव उंचावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()