Unique Wedding : चट मंगनी पट शादी! ओझरच्या जंजाळे- अभंग परिवाराचा निर्णय

Sheetal and Rahul
Sheetal and Rahulesakal
Updated on

Unique Wedding : आजच्या काळात विवाह जुळणे ही बाब तशी अवघड झाली आहे. अनेकदा देण्याघेण्यावरून जुळलेले विवाह मोडतात, पण साखरपुड्याला गेलेल्या परिवाराने चक्क विवाह सोहळा उरकल्याची सुखद घटना येथे घडली आहे.

या सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. सध्याच्या काळात अशाच विवाहांची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. (Unique Wedding on sugarbox ceremony Ozar janjale Abhang familys decision nashik news)

संगमनेर तालुक्यातील कासार दुमाला येथील नंदू संतूजी अभंग आणि ओझर येथील सुभाष फकिरा जंजाळे यांच्या कुटूंबाची ही गोष्ट. सुभाष जंजाळे यांची कन्या शीतलला वरण्याकरीता सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमास अभंग कुटूंब आले होते.

दोन्हीकडचे शेतकरी कुटुंबातील असल्याने वधू आणि वर पक्षामध्ये विवाह सोहळ्यावर चर्चा झाली. दोन्ही पक्षाने वाढीव खर्चाला फाटा देत सुपारीच्या कार्यक्रमातच विवाहसोहळा करण्याचे निश्चित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sheetal and Rahul
Wedding Management : लग्न दणक्यात पण स्वस्तात करायचंय? मग लगेच वाचा या सोप्या ट्रिक्स

त्यानुसार रविवारी (ता.७) साखरपुड्यातच माधव अभंग, शांताराम अभंग, कैलास अभंग व वधू कडील शंकर शिंदे, विश्वनाथ जंजाळे, पुंडलिक मंडलिक, काशिनाथ मंडलिक, शरद मंडलिक यांनी त्यासाठी पुढाका घेतला अन साखरपुड्यातच राहुल व शीतलचा विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतला.

साखरपुड्यानंतर तत्काळ विवाह पार पडल्याने उपस्थितांनी शुभाशीर्वाद देत अक्षता टाकल्या आणि एका अनोख्या मंगलकार्याला आणखी शुभकार्याची अक्षत झालर लावली.

Sheetal and Rahul
Wedding Shopping : लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतल्या फक्त याच ठिकाणी मिळेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.