विकास गिते
Unseasonal rain Damage : सिन्नर तालुक्यातील अनेक भागात सुमारे अर्धा ते एक तास विजेच्या कडकडासह वादळी वारा, गारपीट, अवकाळी पावसाचा हाहाकार विजांसह पावसाने धुडगूस घातल्याने सिन्नर तालुक्यात विशेष करून पूर्व व पश्चिम भागातील अनेक परिसरात शनिवारी तीन वाजेच्या सुमारास अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाने जोरदार हजेरी दिल्याने शेतकरी हैराण झाला आहे. (Unseasonal Rain Arrival of unseasonal rain with hailstorm in Sinnar taluka nashik news)
अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेती पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भाटवाडी, हरसुले ,सोनांबे कोनांबे, डुबेरे, ठाणगाव, पाडळी, टेभुरवाडी आदी भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने अक्षरश: अर्धा ते पाऊण तास हाहाकार केल्याने, रस्त्यांवर तसेच शेतात गारांचा ढीग साचलेला होता.
अचानक आलेल्या पावसाने बळीराजावर पुन्हा मोठे संकट ओढवले असून, उभ्या पिकांत परत पाणी साचल्याने नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे. मागील वर्षी पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळेलेला नाही. त्यामुळे बळीराजा पूर्णतः हतबल झालेला आहे .
पावसाने हजेरी लावल्याने मोठे संकट ओढवले आहे....
काढणीस आलेला गहू, हरभरा ,कांदा पिकांचे द्राक्षे, टरबूज या गाराच्या पावसात मोठे नुकसान झाले असून, शनिवारी पहाटे ढगाळ वातावरण यामुळे अनेक नागरिकांनी या वातावरणाची धास्ती घेतली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना हाती तोंडी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली .असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे. गहू, हरभरा, मका, हे सोगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकड्यांचा वादळ गारांसह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी राजा शेत जमिनीमध्ये असलेल्या पिकाकडे धाव घेऊन कांदा, गहू हे पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. त्यातच द्राक्ष उत्पादकांमध्ये या पावसाने मोठी चिंता वाढवली असून हाती तोंडाशी आलेला घास या गाराच्या व अवकाळी पावसामुळे गेलेला आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू असताना पुतळेवाडी येथील महिलेचा वीज पडून मृत्यू झाला होता. अतिशय दुर्दैवी घटना सिन्नर तालुक्यातील रामपूर येथे घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी सिन्नर तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने गारांसह धुडगूस घातल्याने बळीराजा चिंतातुर झालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.