Unseasonal Rain Nashik : बागलाण, मालेगावला बेमोसमी पावसाने दाणादाण; कांद्याचे मोठे नुकसान

Heavy rains in Aundane, Tarsali area on Saturday (15th) caused damage to summer onions.
Heavy rains in Aundane, Tarsali area on Saturday (15th) caused damage to summer onions. esakal
Updated on

Unseasonal Rain Nashik : बागलाण व मालेगाव तालुक्यात शनिवार (ता.१५) रोजी (Nashik News) सायंकाळी पाच वाजेनंतर पुन्हा अवकाळी पाऊस व सौम्य गारपिटीने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. सर्वाधिक पाऊस बागलाण तालुक्यात झाला. (unseasonal rain Baglan Malegaon lashed nashik news)

चार पाच दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात ज्या गावांना बाधा पोचली नव्हती त्या गावातील शेतकऱ्यांचे आज झालेल्या पावसाच्या तडाख्याने होत्याचे नव्हते झाले. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत दुपारी दोन नंतर आकाशात ढग जमू लागले व चार वाजेपर्यंत काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत होत्या.

साडेपाच वाजेनंतर तरसाळी, औंदाने, वनोली, कौतिकपाडे, विरगाव, डोंगरेज, ढोलबारे, चौगाव आणि परिसरात तब्बल दीड तास मुसळधार पाऊस कोसळला. गारांचाही वर्षाव होत असल्याने सर्वत्र गारांचा खच पडला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Heavy rains in Aundane, Tarsali area on Saturday (15th) caused damage to summer onions.
Nashik Market Committee Election : उमेदवारी अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष; निवडणूक ठरणार काटे की टक्कर

खांडणीसाठी उपटून ठेवलेल्या उन्हाळी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा वेग जास्त असल्याने अर्ध्या तासातच सर्वत्र शेतामध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने उपटून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात भिजला.

द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला,टरबूज या नगदी पिकाचेही या पावसात मोठे नुकसान झाले आहे. भरपूर आलेला आंबा बहाराचा फुलोरा व लहान कैऱ्या गळून पडल्याने आता आंब्याचे उत्पादनही गेल्या वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी घट होणार आहे.

Heavy rains in Aundane, Tarsali area on Saturday (15th) caused damage to summer onions.
Nashik News : रुग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणा; वाहनात सापडलेले पैसे, मोबाईल केला परत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.