Unseasonal Rain
Unseasonal Rain esakal

Unseasonal Rain : बागलाणला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Published on

Unseasonal Rain : बागलाण तालुक्यातील जायखेडा, अंतापूर, ताहराबादला शनिवारी (ता.२२) सायंकाळी सहाला वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. (Unseasonal rain by gale force winds and lightning in baglan nashik news)

या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील पंधरा ते वीस दिवसापासून दोन-तीन दिवसानंतर ढगाळ हवामान तयार होऊन बेमोसमी वादळी वाऱ्यासह दोन-तीन वेळा गारांचा पाऊस झालेला आहे.

पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्यासह गहू, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो आणि पशुधनाच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Unseasonal Rain
Nashik Godavari Pollution : गोदावरीची अवकळा संपणार कधी? चाटोरीकरांनी घेतला पुराचा धसका...

जायखेडा शहरासह परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आठवड्यातून दोन-तीन दिवसात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. आधीच शेतमालाला भाव नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यात ऐन कांदा गळतीच्या वेळेस झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनात मोठी घट झाली असून जे काही उरले ते त्याचे देखील शनिवारच्या पावसामुळे नुकसान झाले. पावसामुळे आंबा, मिरची, टोमॅटो वेलवर्गीय भाजीपाला आदी पिके उद्ध्वस्त झाली.

Unseasonal Rain
Nashik News : रोहित्रांसाठी 40 लाखांचा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.