Unseasonal Rain Crop Damage : अवकाळी पावसामुळे सध्या कांदा वाफ्यातच सडण्याच्या मार्गावर!

Due to untimely rains, the onion in the field is slowly on the verge of perishing
Due to untimely rains, the onion in the field is slowly on the verge of perishing esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शेतकरीवर्गाने जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी गत तीन ते चार महिन्यांपासून उन्हाळी कांद्याची (Onion) लागवड केली होती. (unseasonal rain crop damage Onion has started rotting due to hail and unseasonal rain nashik news)

परंतु कांद्याला सध्या भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विक्री करावा लागत आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सध्या कांदा वाफ्यातच सडू लागला आहे. त्यामुळे शेतकन्यांना कांदा साठवूण ठेवणेही शक्य नाही.

या वर्षी कांदा पीक बहरात असताना मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गारपीट झाली. पावसाने थैमान घातल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे वाफ्यातच कांदा सडू लागला होता. त्यावेळेस अनेक शेतकन्यांनी शेतातच कांदा विक्री केली होती. अनेक शेतकन्यांचा कांदा साठवून ठेवला आहे. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

खरीप, रब्बी दोन्ही हंगामाचे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा पिकाला उत्पादन खर्च जास्त लागतो व विक्रीच्या वेळी भाव मिळत नाही. यावर्षी भरपूर पाणी असल्याने कांदा लागवड मोठया प्रमाणात शेतकरीवर्गाने केली. पण अवकाळी पाऊस व गारपीट ने मोठे नुकसान केले.

त्यामुळे ५०० रुपये प्रति क्विंटल ने कांदा विकावा लागतोय एकरी कांदा लागवड करायला 50 ते 60 हजार रुपयेप्रमाणे खर्च येतो आणी तेवढे उत्पन्नही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Due to untimely rains, the onion in the field is slowly on the verge of perishing
Shivsena News : अयोध्येत शिंदे सेनेचे ‘जय श्रीराम’ पथक रवाना; नियोजनाची जबाबदारी पुन्हा नाशिकवर

असा येतो एकरी खर्च....

रोप तयार करणे - ५ हजार

रोप काढणे - २ हजार

वाफे तयार करणे, लागवड करणे - १० ते १५ हजार

पाणी देणे, फवारणी, निंदने- १५ हजार

कांदा काढणे - १० हजार

साठवून ठेवणे - ५ हजार

"खरीप कांद्याचे आधी अतिवृष्टीने नुकसान झाले त्याही संकटातून वाचलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्री केला परंतु त्याला कवडीमोल दर मिळाला. मार्च महिन्यातही अवकाळी आणि गारपिटीने कांद्याचे नुकसान झाले. आजही कांद्याला सरासरी सहा सात रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

राज्य शासनाने साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान जाहीर केले पण जाचक अटी शर्ती घातल्याने शेतकरी अर्ज जमा करुन घेतले जात नाही. एकंदरीत कांदा शेती निसर्गाच्या आणि सरकारच्या कचाट्यात सापडली असून शेतकरी प्रचंड नैराश्यात आणि आर्थिक संकटात सापडले आहेत."- भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना

Due to untimely rains, the onion in the field is slowly on the verge of perishing
SAKAL Exclusive : गावठाण रहिवासी तीव्र धोक्याच्या पातळीत! अग्निशमनाच्या वाहनांना ‘बॅकअप’ गरजेचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.