Unseasonal Rain Crop Damage: रब्बी हंगामातील पिके भुईसपाट; अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल

For the last two to three days in the taluka, such storms have been present in various areas.
For the last two to three days in the taluka, such storms have been present in various areas.esakal
Updated on

Unseasonal Rain Crop Damage : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका अद्यापही सुरूच आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही येथील शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट हे पिच्छा सोडायला तयार नाही.

भात पिकाचे दुःख विसरत नाही तोच आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या लागवडी पासून शेतकऱ्यांवर आपत्ती सुरु आहे.

संकटातूनही कसे बसे सावरत आलेल्या पिकांवर आता अवकाळी पावसाचा मारा अनेक पिकांना मारक ठरत असून पिकांच्या उत्पादनात घट आणि नगदी पिकांवर होणाऱ्या परिणामाच्या भीतीने बळीराजाचे आर्थिक गणित चुकले आहे. (Unseasonal Rain Crop Damage Rabi season crops ground farmers tension nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

For the last two to three days in the taluka, such storms have been present in various areas.
Unseasonal Rain Crop Damage : पावणे 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मागील महिन्यातही अवकाळी पावसाने तालुक्याच्या विविध भागात मारा केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम भागात झालेल्या शिकाव्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पावसाने हंगामातील काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी व मसूर आदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत असून यामुळे हातातोंडावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

"कष्टाने पिकविलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होत आहे. शेतकरी बांधवांना अगोदरच मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधवांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी आशा आहे." - समाधान कोकणे, शेतकरी, आडवण

"गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण व वारंवार होणाऱ्या शिडकाव्यामुळे नुकसान होत आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांना याचा फटका बसणार आहे."

- प्रल्हाद धांडे, शेतकरी, पाडळी देशमुख

For the last two to three days in the taluka, such storms have been present in various areas.
Unseasonal Rain : अवकाळी अन् गारपिटीने मेंढपाळांचा जीव मुठीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.