Unseasonal Rain Damage : आम्हाला मदत द्या हो! आडगावच्या शेतकऱ्याची आर्त हाक

Damage to polyhouse due to bad weather and storm.
Damage to polyhouse due to bad weather and storm.esakal
Updated on

Unseasonal Rain Damage : आडगाव येथील पॉलिहाऊसचे अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने नुकसान झाले. त्याचा पंचनामा झाला पण एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ‘आम्हाला मदत द्या हो !‘ अशी आर्त हाक सरकारला दिली आहे. (Unseasonal Rain Damage Adgaon farmers call for help nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Damage to polyhouse due to bad weather and storm.
Chandrashekhar Bawankule : पंचनाम्यातील त्रूटीं दूर करण्यासाठी प्रयत्नशील : चंद्रशेखर बावनकुळे

उत्तम ढारबाळे या तरुणाने उच्च शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता गुलाबाची फुलशेती करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने एकरामध्ये गुलाब लावला. पैसे जमा करून पॉलिहाऊसची उभारणी केली. याच पॉलिहाऊसवरील कागद उडून गेला.

अनेक ठिकाणी कागद फाटला. पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मदत मिळाली नाही, तर शेती बंद करून कर्ज फेडण्यासाठी पुन्हा शहरात नोकरीसाठी जायचे काय? असा प्रश्‍न त्याच्यापुढे तयार झाला आहे. आडगाव शिवारात फूल शेतीच्या जोडीला द्राक्षांच्या शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

"अवकाळी वादळी पावसामुळे पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले. पॉली हाऊसला आर्थिक मदत मिळत नसल्याने पॉलिहाऊस धारक शेतकऱ्यांमध्ये चिंता तयार झाली आहे."

- उत्तम ढारबाळे, फूल उत्पादक

"आडगावमध्ये माझी तीन एकर द्राक्ष शेती आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले. सरकारी मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी."- सुनील नवले, द्राक्ष उत्पादक

Damage to polyhouse due to bad weather and storm.
Nashik News : गडावरील शीतकड्याचे संरक्षक कवच वाढवा! आत्महत्येच्या घटना चिंताजनक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()